लंपी या आजाराचा मानवाला कोणताही धोका नाही -डॉ. रामचंद्र मोहिते
अकलूज (प्रतिनिधी )सध्या लंपी या आजाराची जनावरांना काही ठिकाणी लागण होत आहे. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत.दुधापासून माणसाला काही धोका होतो का?अशा प्रकारची विचारणा माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांचेकडे होत आहे.या अनुषंगाने डॉ. मोहिते यांनी लंपी या आजाराची अद्याप पर्यंत माणसाला लागण झाल्याची घटना ऐकण्यात नाही. तसेच दुधापासून माणसाला लागण झाल्याची घटनाही ऐकण्यात नाही.तरी पण एक काळजी म्हणून आपण जनावराचे दूध उकळून किंवा चहामध्ये पिण्यास कुठली हरकत नाही.असे आवर्जून सांगितले.ते पुढे बोलताना म्हणाले की, कुठलेही दुग्धजन्य पदार्थ उकळलेल्या दुधापासून केले असल्यामुळे ते खाण्यास कुठली हरकत नाही.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता दूध पिण्यास हरकत नाही असे सांगितले.







