*ब्रेकिंग! ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचं96व्या वर्षी निधन*
ब्रिटनची दुसरी राणी एलिझाबेथ यांचं निधन झालं आहे. 96 व्या वर्षी त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या चिंताजनक प्रकृतीमुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बालमोरल कॅसलमध्ये अगोदरच दाखल झाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनीदेखील राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. बकिंघम पॅलेसच्या या बातमीने संपूर्ण देश चिंतेत आहे. युनायटेड किंगडममधील लोकं राणी आणि तिच्या कुटुंबासोबत असल्याचे त्यांनी ट्विट केले होते.दरम्यान, राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने लंडनमध्ये शोककळा पसरली आहे.







