*सहकार महर्षी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर पुरस्काराने सन्मानित* संग्रामनगर दि.८ (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांना भारतीय शुगर पुणे या संस्थेने सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात मानाचा समजला जाणारा बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर को-ऑपरेटिव्ह शुगर अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे. साखर कामगार कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र चौगुले यांचे वडील के.टी.चौगुले यांनी तब्बल ३० वर्षे कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्यामध्ये शेती खात्यात हेडकलार्क,केन अकाउंटंट,लीगल ऑफिसर म्हणून काम केले आहे. साखर कारखाना परिसरात बालपण घालवलेले राजेंद्र चौगुले यांचे साखर कारखानदारी व्यवसायाशी अगदी घनिष्ठ संबंध राहिले आहेत.त्यांचे शिक्षण बीएससी एव्हीएसआय (शुगर टेक) डीबीएम इतके झाले असून साखर उद्योगात काम करण्याचा त्यांना ३६ वर्षाचा अनुभव आहे.त्यांनी कोल्हापुरातील कुंभी कासारी साखर कारखान्यात पंचवीस वर्ष काम केले असून त्यापैकी सोळा वर्ष “चीफ केमिस्ट” या पदावर काम केले आहे.या काळात त्यांनी सरासरी साखर उताऱ्यात राज्यातील पहिल्या चार साखर कारखान्यात सातत्याने अग्रेसर राहिले आहेत.सन २०१५ मध्ये त्यांची कार्यकारी संचालक पॅनेलवर निवड एमडी असोसिएशन व कोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक असलेल्या राजेंद्र चौगुले यांनी कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम कारखान्यात कार्यकारी संचालक पदावर दोन वर्षे काम केले तर आता ते गेल्या चार वर्षापासून शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यात कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत श्री.चौगुले स्वतः टेक्निकल असल्याने तसेच क्रीडा क्षेत्राची त्यांना उत्तम जाण असल्याने त्यांनी साखर उद्योग क्षेत्रात कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यात समन्वय साधून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर उद्योगातील उत्पादन खर्च कमी करणे,साखरेचे व अल्कोहोलचे उत्पादन वाढवणे, गुणवत्ता राखणे,क्षमता व कार्यक्षमता वाढवणे यासाठी उत्तम काम केले आहे तसेच आरईसी मध्ये कारखान्यास आठ कोटी रुपये मिळवून देण्यात हि त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे यापूर्वी त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सन २०१३-१४ चा राज्यस्तरीय बेस्ट चीफ केमिस्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री चौगुले यांच्या पत्नी डॉ.संगीता चौगुले या भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्राचार्य पदावर कार्य केले असून त्यांनी आतापर्यंत सोळा विद्यार्थ्यांना पीएचडी साठी मार्गदर्शन केले आहे. त्या केआयटी कॉलेजच्या डिन म्हणून ही कार्यरत आहेत.त्यांची मुलगी अमृता चौगुले ही व्हीआयटी कॉलेज वेल्लोर येथे एम.टेक असून कोल्हापूरातील डि.वाय.पाटील इंजिनियरींग कॉलेजमध्ये कार्यरत आहे.तर मुलगा धीरज चौगुले व सून सौ.मधुरा चौगुले हे बी.ई.मेकॅनिकल असून डेरी उद्योगांमध्ये कार्यरत आहेत त्यांचे बंधू संजय चौगुले हे गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नामवंत तीस पेक्षा जास्त साखर कारखान्यामध्ये हाय प्रेशर बॉयलर वॉटर ट्रीटमेंट व फॅक्टरी वॉटर मॅनेजमेंटचे काम करीत आहेत एकंदरीतच वडिलांपासून ते घरातील कुटुंबातील गेली साठ वर्ष साखर उद्योगातील निगडित असलेल्या राजेंद्र चौगुले यांना यावर्षीचा भारतीय शुगर,पुणे या संस्थेचा मानाचा समजला जाणारा *”बेस्ट मॅनेजिग डायरेक्टर को-ऑपरेटिव्ह शुगर अवॉर्ड”* मिळाल्याने राज्यातील साखर कामगार क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.तसेच कमीत कमी प्रति टन केमिकलचा वापर,चुना खरेदीची नवीन पद्धत कंझम्पशन व डिडक्शन सर्वात प्रथम चालू केली आहे. श्री.चौगुले यांनी बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर को ऑपरेटिव्ह शुगर अॅवाॅर्ड मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळ यांनी त्यंचे अभिनंदन केले आहे.








