अकलूज –
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक संजय गळीतकर प्रशाला कमिटी सदस्य अनिल जाधव अभिरूप मुख्याध्यापक पर्यवेक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रतिमेचे
पूजन केले मुख्याध्यापकांनी अभिरूप मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिपाई या सर्वांचे कौतुक केले त्यानंतर नववी अ मधील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला कुमारी वैभवी गोडसे हिने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती सांगितली शिक्षक मनोगतामध्ये रामचंद्र चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी डॉक्टर अप्पा टेळे यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत प्रशालेतील सर्व शिक्षकांची अत्याधुनिक मशीनद्वारे नेत्र तपासणी केली इयत्ता दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिरुप शिक्षकांची भूमिका पार पाडत दिवसभर इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गाकरिता अध्यापनाचे कामकाज पाहिले इयत्ता दहावी मधील अभिरूप विद्यार्थी मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिपाई यांची तयारी करण्यासाठी वर्गशिक्षक रचना रणवरे शिवाजी थोरात व गणेश जाधव यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता सारे जहासे अच्छा या देशभक्तीपर गीताने झाली








