*महषिॅ प्रशालेतील तीन खेळाडूंची सोलापूर जिल्हा बास्केटबॉल संघात निवड*
शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथील दिनांक 5 व 6 सप्टेंबर 2022 रोजी श्री.विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल अकलूज येथे झालेल्या सोलापूर शहर व जिल्हा अॅम्युचर बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 18 वर्ष वयोगट जिल्हा निवड चाचणी मध्ये कु. दिव्या टेकाळे, कु.श्रावणी रणनवरे, कु.सलोनी गायकवाड या तीन खेळाडूची निवड करण्यात आली.प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर, संघाचे प्रशिक्षक व स्थानिक प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव याच्या हस्ते खेळाडूचा सत्कार करण्यात आला. जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, स्थानिक प्रशाला समिती सभापती अँड.नितीन खराडे यांनी खेळाडूचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी माजी. मुख्याध्यापक भिमराव मुळे,पर्यवेक्षक अंकुश एकतपूरे, क्रिडा शिक्षक अनिल मोहिते ,डाॅ.महेश ढेंबरे,,शशांक गायकवाड ,शिक्षिका प्रतिनिधी भाग्यश्री गुजरेउपस्थित होते. सूत्रसंचालन किरण सुर्यवंशी यांनी केले.







