सोलापूर /प्रतिनिधी/ भैय्या खिलारेमोहोळ -: अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी मौजे कोणेरी तालुका मोहोळ येथील समाधान उत्तम कांबळे यांची तर पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी मंगळवेढा येथील पद्मिनी वरिष्ठराव शेवडे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे यांच्या शिफारशिनुसार पक्षाध्यक्ष प्रवीण खोबरागडे यांनी कांबळे व शेवडे यांच्या निवडी घोषित केल्या आहेत.पक्षाचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष निंगप्पा गायकवाड यांची पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारणीवरती निवड झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी समाधान कांबळे यांची निवड केली आहे. समाधान कांबळे हे चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांना समाजकारणाबरोबर राजकारणाची देखील आवड आहे. तर पद्मिनी शेवडे यांनी पक्षाच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून उत्कृष्ठ काम केले असून पक्षाने त्यांच्यावर आता पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या पाच जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. कांबळे व शेवडे यांच्या निवडीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा बारसागडे, प्रदेश अध्यक्ष संजय बोरकर, रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजस खोबरागडे, प्रदेश सचिव डी. के. साखरे, अमित ढवारे (सांगली), आप्पा कांबळे (सांगली), संतोष मोरे (कोल्हापूर ), लक्ष्मण वाघमारे (पंढरपूर ), रामदास धाईंजे (माळशिरस), समाधान भोसले (मंगळवेढा) आदींनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शेभेच्छा दिल्या.







