सोलापूर जिल्ह्यातून दिल्ली येथे झालेल्या मंहगाई पर हल्लाबोल या महारॕलीसाठी २४०पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचेअध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून व देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आ. प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातून दिल्ली येथे झालेल्या मंहगाई पर हल्लाबोल या महारॕलीसाठी २४०पदाधिकारी व कार्यकर्ते महारॕलीसाठी गेले होते. जिल्ह्यातील पदाधिकारी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या अध्यक्षेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी आदी महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेतली.दिल्ली येथे झालेल्या महारॕलीसाठी सोलापूर मधून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील, माजी उपसभापती शिवयोगी बिराजदार, जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे, अभिषेक कांबळे,प्रशांत साळे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार, धर्मराज पुजारी, संदीप भंडारे तालुकाध्यक्ष सतीश पालकर, शहराध्यक्ष नवनाथ साठे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष वसीमभाई पठाण, मयूर माने, सुरेश मगर, निखिल फुले, रवींद्र यादव, जयसिंग मोरे,बाळासाहेब मगर, दादासो जाधव, विठ्ठल इंगळे, बबनराव शेंडगे, शैलाताई गोसावी, ज्योतीताई कुंभार, मुबारक कोरबू,अविनाश भोसले, फिरोज देशमुख, मोहसीन बागवान, जावेद बागवान, जावेद तांबोळी, सिध्दाराम खुटेकर,शिवानंद बगले, आदीसह २४० पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिल्ली येथे झालेली हल्लाबोल महारॅली यशस्वी केली.









