राऊतनगर (दत्तनगर )-अकलूज येथील मोरया गणपती मंडळास अकलुज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट
अकलूज (प्रतिनिधी )राऊतनगर (दत्तनगर )-अकलूज येथील मोरया गणपती मंडळास अकलुज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी भेट दिली.यावेळी नागरिकांनी परिसरातील अनेक अडचणी सांगितल्या .येत्या काही काळात या सर्व अडचणी सोडवून भविष्यात या भागात पिण्याच्या पाण्याची.गटारिची व विविध अडचणी सोडविल्या जातील असे सांगितले. प्रतिष्ठान चे अध्यक्ष कु.गोपाळ मस्तुद यांनी शिवतेजसिंह यांचा यथोचित सन्मान केला.यावेळी या प्रतिष्ठान व मंडळाचे मार्गदर्शक .मारुती क्षिरसागर यांनी महिलांच्या संगीत खुर्ची. रांगोळी स्पर्धा या सारखे विविध उपक्रम राबविले.व ते यशस्वी रित्या पार पडले.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.मोहिते पाटील यांनी विशेष करून सर्व महिलांच्या अडचणी समजून घेत त्या अडचणी संपूर्ण सोडवण्याचे आश्र्वासन दिले.यावेळी मंडळाचे गोपाळ शिवाजी मस्तुद.सुदेश मारुती क्षिरसागर.विजय बबन गायकवाड.रविराज शिवाजी जाधव.सागर किरण शिंदे.हरिश्चंद्र किसन काळे.आर्यन भिमराव नागरगोजे.तेजस शहाजी माने,देशमुख.यांच्यासह.सौ.वंदना मारुती क्षिरसागर.सौ.अर्चना किसन काळे.सौ.रेखा शिवाजी मस्तुद.सौ.चंचलाताई किरण शिंदे.श्रीमती.मायाताई बबन गायकवाड व परिसरातील सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमात व स्पर्धेत सहभागी होवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला यावेळी सामाजिक कार्यकर्ते.मारुती क्षिरसागर.शिवाजी मस्तुद.हमीद मुलाणी.राजाभाऊ माने.मदन चव्हाण व परिसरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.













