संत निरंकारी मिशनच्या वतीने निरा नरसिंगपूर (संगम) येथे साक्षात गौरी पूजनाचा कार्यक्रम संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )संत निरंकारी मिशन हे जागतीक अध्यात्मीक चळवळ आहे. या मिशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून मानव जातीला परिवर्तनशील बनवण्याचे काम मिशन करत असते. मानव जातीला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी वेगळा संदेश देण्याचे काम करत असते. सध्या गौरी गणपती सणाचे औचित्य साधून निरंकारी मिशन ने संत निरंकारी मंडळ ब्रॕच निरा नरसिंगपूर (संगम) येथे बळीराम गलांडे यांच्या घरी गौरीपूजन स्थापना करुन एक वेगळा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.














