*बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्षपदी अॅड.विवेक घाटगे यांची निवड झालेबद्दल माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला.** संग्रामनगर दि.१ (केदार लोहकरे याजकडून)बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष पदी अॅड.विवेक घाटगे यांची निवड झाले बद्दल आज माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे हस्ते अजिंक्यतारा येथे सत्कार करणेत आला. यावेळी खंडपीठ कृती समितीस बोलताना माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील म्हणाले की,सहा जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी,आमदार,खासदार यांना सर्किट बेंच प्रश्नी एकत्र येवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना लवकरच भेटणार आहे.तसेच ना.चंद्रकांत दादा पाटील हे जेष्ठ व अनुभवी नेते असलेने या सर्किट बेंच बाबतची संपूर्ण माहिती व कल्पना त्यांनाही आसल्यामुळे त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहे.सहा जिल्ह्याचा सर्किट बेंच स्थापनेचा लढा अंतिम टप्यावरती आहे तरी सर्व सामान्य जनता व पक्षकार यांचे करीता तो लवकर यशस्वी होणे करीता सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येणे गरजेचे आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड.एम.डी.अडगुळे,सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख,अॅड संदीप चौगुले,माजी अध्यक्ष संपतराव पवार,अॅड.अजित मोहिते,अॅड.प्रशांत चिटणीस,अॅड.इंद्रजित चव्हाण आणि अॅड.वारणा सोनवणे इ.उपस्थित होते.







