• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

पालखी मार्गावरील जनतेच्या अडचणी दूर करा : आ मोहिते पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 2, 2022
in महाराष्ट्र
0
पालखी मार्गावरील जनतेच्या अडचणी दूर करा : आ मोहिते पाटील
0
SHARES
707
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालखी मार्गावरील जनतेच्या अडचणी दूर करा : आ मोहिते पाटील

अकलूज / प्रतिनिधी – माळशिरस तालुक्यातून जाणा-या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्गावरील जनतेच्या अडचणी तातडीने सोडवा अशा सूचना आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या . पालखी मार्गात गेलेल्या जमिनी , जागा , इमारती , झाडे यांच्या नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडली गेली असली तरी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाबद्दल अनेक शेतकरी व नागरीकांच्या तक्रारी होत्या . या तक्रारी निवारण करण्यासाठी आ मोहिते पाटील यांनी अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक शिवरत्न बंगल्यावर आयोजित केली होती . या बैठकीस आ राम सातपुते , प्रांताधिकारी ज्योती कदम , तहसीलदार जगदीश निंबाळकर , तालुका भूमिलेखा अधिकारी प्रिया पाटील , कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग , राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक इंद्रकुमार नारायणकर , उप अभियंता एल डी डाके , शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील , माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , प्रताप पाटील , माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील , कारखान्याचे व्हा . चेअरमन ॲड प्रकाश पाटील , माजी सभापती रावसाहेब पराडे , ओंकार माने देशमुख , शंकर काकुळे , महादेव ताटे , डॉ उदय माने देशमुख , भैय्यासाहेब इनामदार , दीपक राउत , नितीनराजे निंबाळकर , विजयकुमार देशमुख , मधुकर जाधव यांच्यासह पालखी मार्गावर बाधित झालेले शेतकरी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . आ मोहिते पाटील म्हणाले , पालखी मार्गावरील शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत . या तक्रारीची सुनावणी घेवून निर्णय घेतला पाहिजे . संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराची दखल घेतली पाहिजे . पालखी मार्गात रस्त्यालगतची अनेक लोकांची घरे गेली आहेत . त्या लोकांना नवीन जागा उपलब्ध करुन द्यावी असे आ मोहिते पाटील यांनी सांगितले . संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी पिसेवाडी , वेळापूर येथे भूसंपादन करण्यात आले आहे . हे भूसंपादन करताना १९७१ पुर्वीच्या पालखी मार्गाचा नकाशा ग्राह्य धरण्यात आला आहे . परंतु १९७२ च्या दुष्काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन महाड – पंढरपूर हा राज्यमार्ग तयार केला . या मार्गात असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या . या जमिनी ७ / १२ उताऱ्यावरुन कमी करण्यात न आल्याने व या रस्त्याची नोंद सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नसल्याने सध्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग ९६५ करीता आरक्षित केलेल्या जमिनीत मोठी तफावत दिसत आहे . या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणने व्यवस्थित ऐकून घ्यावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा असेही आ मोहिते पाटील यांनी सांगितले . पालखी मार्गामुळे बोंडले गांवच उध्वस्त झाले आहे . त्या भागातील लोकांची घरे , मोठ्या इमारती , ग्रामपंचायत कार्यालय , शाळागृह , स्मशानभूमी , लहानमोठी दुकाने आदी जमिनदोस्त झाले आहे . या गावाला गावठाण शिल्लक राहिले नाही . आता पुन्हा नवीन जागेवर आरक्षण टाकले जाणार असल्याचे समजते . असे झाले तर गाव स्थलांतरित करावे लागेल अशी भिती सरपंच विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली . प्रांताधिकारी ज्योती कदम म्हणाल्या , संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात गेलेल्या जागा , जमिनी ,खाजगी , शासकीय इमारती , झाडे याबाबतची सर्व माहिती प्रकल्प संचालकांकडून आमच्याकडे येते . त्यानुसार आम्ही रकमेचे वाटप करतो . प्रकल्प संचालकांनी व राष्ट्रीय महामार्गांच्या मुंबई कार्यालयाने निवाडा मंजूर केल्यानंतर त्यातील जमिनीचे , इमारतीचे , झाडांचे मुल्यांकन बदलण्याचे वा वाढविण्याचे कोणतेही अधिकार या कार्यालयाला नाहीत . त्यासाठी सक्षम लवादाकडे दाद मागावी लागते . ज्या शेतकऱ्यांना , नागरीकांना निवाडा मंजूर नाही त्यांनी लवादाकडे दाद मागावी असे कदम म्हणाल्या .

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान!*

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान!*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In