*महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तातडीने बैठक लावण्या बाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते यांना निवेदन देण्यात आले**
श्रीपूर*महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे कामगारांच्या विविध विषयांवरील मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तातडीने बैठक लावण्या यावी यासाठी आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते यांना महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे पदाधिकारी यांनी अँड प्रकाशराव पाटील उपसभापती प्रतापराव पाटील नानासाहेब मुंडफणे यांचे मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघ प्रातिनिधिक युनियन इंटक प्रणित माळशिरस अध्यक्ष सुरेश मोहिते सेक्रेटरी भालचंद्र शिंदे पाटील नगरसेवक उदय पाटील नातेपुते मोहसीन पठाण आबा कांबळे शंकर मोरे दिगंबर सरवदे सोमा रंधवे भारत कांबळे गुलाब शेख विठ्ठल गेजगे यांनी लेखी मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या आहेत महामंडळाचे कामगारांना न्यायालयाचे आदेश असतानाही रहाण्यासाठी दोन गुंठे जागा व घरे बांधून दिली जात नाहीत सध्या रहात असलेल्या घरांची अवस्था दयनीय आहे सहावा वेतन आयोग अद्यापही लागु नाही चौथा पाचवा वेतनाचा फरक अद्याप मिळालेला नाही तसेच इतरही मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा व बैठक लाऊन कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली आहे सेवानिवृत्त व रोजंदार कामगार तसेच मयत कामगारांचे वारस व कामांवर असलेल्या कामगारांना रहाण्यासाठी दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान योजनेतून त्यांना घरे बांधून द्यावीत औद्योगिक न्यायालयाच्या निकालानुसार रोजंदार कामगारांना समान कामास समान वेतन देण्यात यावे शेती महामंडळाचे कामगारांना पाच एकर जमीन देण्यात यावी राज्य सरकारने शेती महामंडळाचे कर्ज रुपये 48कोटी व त्यावरील 18% व्याज माफ करावे या व इतर मागण्या असलेलं लेखी निवेदन आमदार महोदयांना देण्यात आले लवकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सदर निवेदन देऊन बैठक लावण्या बाबत पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन आमदारांनी दिले आहे







