*नायपर, कोलकत्यामधील श्री. सौरभ चौरे यांचे गणपती फार्मसी मध्ये जीपॅट विषयी मार्गदर्शन*
अकोले खुर्द, ता. माढा येथील गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी जीपॅट या परीक्षेच्या तयारीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली.या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. सौरभ चौरे ( नायपर, कोलकत्ता )यांनी विद्यार्थ्यांना जीपॅट परिक्षेविषयी मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील बी. फार्मसी मधील सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सौरभ चौरे यांनी जीपॅट या परिक्षेसाठी पात्रता, प्रवेश देणाऱ्या विविध शासकीय व निमशासकीय संस्था, परीक्षेचे मुख्य विषय, मार्किंग स्किम, परीक्षा पास झाल्यानंतर मिळणारी शिष्यवृत्ती आणि परिक्षेसाठी करावी लागणारी तयारी याचे सखोल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी महाविद्यालयाचे सचिव डॉ रविद्र बेंदगुडे यांनी जीपॅट या परिक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. सुकुमार लांडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रा. महादेवी भोसले, प्रा. प्रशांत मिसाळ , प्रा. शिवराज ढगे, प्रा. गंगा गोरे उपस्थित होते.







