*आजच्या युगात तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला. प्रा.आनंद गिरी.*कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या 32 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रा.आनंद गिरी यांनी खंत व्यक्त केली.
संग्रामनगर दि.२ (केदार लोहकरे याजकडून)कोडोली (ता.पन्हाळा)”आजच्या युगात तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला असून पट्टे बापूराव व पवळाचा तमाशा आज राहिला नाही.तमाशातील वगाच्या दौलतजादाला आज प्रेक्षक थांबत नाहीत.आजच्या शाहीरांना कलगीतुरा ही भेदीक शाहिरी गाता येत नाही,”अशी खंत पन्हाळा येथील सुरभी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ लोक साहित्यिक प्रा.आनंद गिरी यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केली. कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या 32 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात व्याख्या पुष्प गुंफताना ते बोलत होते.*”लोकसंस्कृती काल :आज आणि उद्या”* हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ.जयंत प्रदीप पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील होते.याप्रसंगी शाहीर शहाजी माळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वी ग्रंथपाल प्रा.डी. डी.पाटील आणि त्यांच्या पत्नी वृषाली पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती,संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील, माजी व्यवस्थापक कै.प्रदीप यशवंत पाटील यांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली.त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स वर्षाचे औचित्य साधून हर घर तिरंगा या देशभक्तिपर घोषणेनुसार महाविद्यालयाच्या प्राचार्य,ग्रंथपाल,प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी – शिक्षकांनी घरात कुटुंबासमवेत केलेल्या झेंडावंदनाच्या छायाचित्रांच्या अल्बमचे प्रकाशन प्रा.गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजिलेल्या रांगोळी व भित्तिपत्रक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी-शिक्षकांना पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीसपात्र विजेते पुढीलप्रमाणे : रांगोळी स्पर्धा-अनुष्का अभिजित खंबाळे ( प्रथम),ऋतुजा सीताराम हुजरे आणि सायली किरण मोळे (द्वितीय क्रमांक विभागून), स्नेहा धोंडीराम बांगर – केकरे (तृतीय),सोनाली सुनील पाटील(उत्तेजनार्थ) भित्तिपत्रक-नवरंग प्रभाकर कुलकर्णी (प्रथम),धैर्यशील अशोकराव पाटील (द्वितीय),स्फूर्ती पंडित चौगुले (तृतीय) ऋतुजा सीताराम हुजरे,अनुष्का अभिजित खंबाळे आणि सायली किरण मोळे (उत्तेजनार्थ) प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरुप होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचे सिंहावलोकन करताना संस्थाध्यक्ष माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. महाविद्यालयाच्या प्रगतीत कै.प्रदीप यशवंत पाटील, सेक्रेटरी डॉ.जयंत पाटील,अध्यक्षा पद्मजादेवी प्रदीप पाटील,विश्वस्त विनिता जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाहीर शहाजी माळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.डी.डी.पाटील यांनी केले.विद्यार्थी-शिक्षक नवरंग प्रभाकर कुलकर्णी आणि माजी विद्यार्थी-शिक्षक वैभव पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा. एस.डी.रक्ताडे यांनी आभारप्रदर्शन केले.विद्यार्थिनी-शिक्षिका अनुष्का अभिजित खंबाळे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.श्रीमती गुलनास मुजावर,प्रा.संजय जाधव,कार्यालयीन अधीक्षक एस.के.पाटील आणि तानाजी मोहिते आदींनी परिश्रम घेतले.







