*कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होणेकरिता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याशी तातडीने चर्चा करून सर्किट बेंच प्रश्न मार्गी लावणार-ना.चंद्रकांत दादा पाटील* संग्रामनगर दि.३० (केदार लोहकरे याजकडून)कोल्हापूर येथे सहा जिल्हयासाठी सर्किट बेंच स्थापन करणेसाठी सहा जिल्ह्यातील लोकांचा गेली 35 वर्षे लढा चालू आहे.कोल्हापूर येथे सर्किट बेंच सर्व सामान्य जनता,पक्षकार करीता स्थापन होणे आवश्यक आहे याकरिता लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना भेटून चर्चा करून तातडीने सर्किट बेंच प्रश्न मार्गी लावणार.तसेच मा.मुख्यन्यायमूर्ती व मा.मुख्यमंत्री यांची भेट लवकर घडवून आणणार असे आश्वासन ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज खंडपीठ कृती समितीने ना.चंद्रकांत दादा पाटील,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष अॅड.विवेक घाटगे यांनी ना.चंद्रकांत दादा पाटील यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाले बद्दल शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके म्हणाले की,सर्किट बेंच लढा अंतिम टप्यात आहे मा.मुख्यमंत्री व मा.मुख्यन्यायमूर्ती यांची या विषयी लवकर भेट होणे आवश्यक आहे.तरी आपण मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री साहेब यांना भेटून मा.मुख्यन्यायमूर्ती यांना भेटण्याविषयी पत्र व्यवहार करणे आवश्यक आहे असे सांगितले. यावेळी ना.चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,सहा जिल्ह्याचा सर्किट बेंच प्रश्न मला माहित आहे तरी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होईपर्यंत मी स्वतः लक्ष देऊन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. सदर भेटीवेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड.एम.डी.अडगुळे, कोल्हापूर जिल्हा बार असो उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,सचिव अॅड.विजयकुमार ताटे- देशमुख,अॅड.संदीप चौगुले,माजी अध्यक्ष अॅड.शिवाजीराव राणे,अॅड.विवेक शुक्ल,अॅड.शिवराम जोशी,अॅड.प्रशांत देसाई,अॅड.व्ही.आर.पाटील,अॅड. कोमलराव राणे,अॅड.तृप्ती नलवडे,अॅड.सुशांत चेंडके,अॅड.महांतेश कोल्हे उपस्थित होते.







