*दिव्यांग नागरिकांना शासकीय ससेहोलपट व कसरतीतून मुक्त करावे*धैर्यशील मोहिते पाटील.
*संग्रामनगर दि.२९ (केदार लोहकरे याजकडून)दिव्यांग नागरिकांना महाराष्ट्र शासन आर्थिक तसेच सामाजिक स्तरावरील विविध योजनांचा लाभ देत असते,योजनांचा लाभ मिळावा या करीता दिव्यांग नागरिकांना प्रशासकीय वर्षा अखेरीस उत्पन्नाचा दाखला हायतीचा दाखल सादर करावा लागतो.जे दिव्यांग व्हीलचेअर,वाॅकर व इतर साधनाचा वापर करतात तसेच ज्या दिव्यांगाना दुसर्या व्यक्तींच्या अधाराशिवाय ज्यांना उभा किंवा बसता देखील येत नाही.तसेच कृत्रिम अवयव असलेल्या दिव्यांग नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी हयातीचा दाखला मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन समक्ष उपस्थित राहून हयातीत असलेला पुरावा सादर करावा लागतो. दिव्यांग नागरिकांच्या दृष्टीने शासकीय दाखले काढण्यासाठीचा प्रवास व ससेहोलपट करत केलेली कसरत अंत्यत कष्टदायक आहे. शासकीय पातळीवर दिव्यांगाना व त्यांच्या परिवारास यातना व वेदना दोन्हींचा सोबत सामना करावा लागतो.दिव्यांग नागरिकांना शासकीय कसरतीं मधून मुक्त करण्यासाठी जर एखाद्या गावात दिव्यांग नागरीक असेल तर ग्रामस्तरावर तलाठी,ग्रामसेवक,कोतवाल,आशा वर्कर,यांच्या मार्फत दिव्यांग नागरीकांचा हयातीत असलेला शेरा अथवा पुरावा संबंधित प्रशासकीय यंत्रणेस कळवत दिव्यांग नागरिकांना आवश्यक असणारा हयातीतचा व इतर शासकीय दाखलेसुद्धा घरपोच मिळावेत.अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपण राज्याचे लोकनेते आहात,दिव्यांग नागरिकांना शासकीय ससेहोलपट व कसरतीतून मुक्त करावे.अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवेदना मार्फत मागणी केली आहे.







