*कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त रांगोळी व भित्तिपत्रक स्पर्धा संपन्न.*
संग्रामनगर दि.२९ (केदार लोहकरे याजकडून)कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त महाविद्यालयात आज रांगोळी स्पर्धा व भित्तिपत्रक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी रांगोळी स्पर्धेत महाविद्यालयातील 25 विद्यार्थिनीनी भाग घेतला होता.भित्तिपत्रक स्पर्धेत 55 विद्यार्थींनी सहभाग नोंदविला होता. “वारणेचा वाघ”अशी ख्याती असलेले पन्हाळा – गगन बावडा – वैभव वाडी मतदार संघाचे सतत 25 वर्षे आमदार असलेले माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील (दादा) यांनी 1 सप्टेंबर 1990 ला पन्हाळा तालुक्यातील कोडोलीसारख्या ग्रामीण,डोंगरी भागात या बी.एड.प्रशिक्षण महाविद्यालयाची स्थापना केली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव व संस्थेचे माजी व्यवस्थापक कै.प्रदीप बाबा पाटील यांच्या व्यवस्थापनाखाली महाविद्यालयाच्या प्रगतीची कमान चढती राहिली.संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा पद्मजा पाटील या आहेत.त्यांच्यासह सेक्रेटरी डॉ.जयंत प्रदीप पाटील व विश्वस्त सौ.विनिता जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय सध्या प्रगतिपथावर आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महाविद्यालयाचा ३२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.त्याअंतर्गत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका जी.के.मुजावर, सहाय्यक प्रा.संजय गणपती जाधव,सर्व प्राध्यापक,ग्रंथपाल व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यामध्ये विद्यार्थी – शिक्षकांचे ही उत्तम सहकार्य लाभले. येथील यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका सारिका मदन माने व प्रा.चंदारानी उमेश पाटील यांनी भित्तिपत्रक स्पर्धेचे परीक्षण केले.तर यशवंत विद्यामंदिरच्या शिक्षिका वैशाली सुभाष पोवार व शोभा अशोक मोरे यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले. या सर्व विजेत्या स्पर्धकांना १ सप्टेंबरला सकाळी साडे दहा वाजता प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ लोक साहित्यिक प्रा.आनंद गिरी व श्री. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.जयंत प्रदीप पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे यावेळी स्टाफ आणि विद्यार्थी – शिक्षकांनी केलेल्या झेंडावंदनाच्या छायाचित्रांच्या अल्बमचे प्रकाशन वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.










