सोलापूर /प्रतिनिधी : भैय्या खिलारे
सोलापूर -: अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष प्रणित रिपब्लिकन भटक्या सेल च्या सोलापुर जिल्हा अध्यक्षपदी हाजापूर तालुका मंगळवेढा येथील आदिवासी पारधी समाजाचे प्रमुख रविंद्र बिरा काळे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या शिफारशिनुसार पक्षाध्यक्ष प्रवीण खोबरागडे यांनी त्यांची निवड घोषित केली आहे. रविंद्र काळे हे चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांनी अनेक सामाजिक आंदोलांनामध्ये सहभाग नोंदवीला आहे.निवडीनंतर बोलताना काळे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण देशामध्ये दलित,आदिवासी, अल्पसंख्यांक व महिलांच्यावरती अत्याचार होत असून त्याला पायबंद घालण्यासाठी आपण तळागाळातील लोकांचे संघटन करून पक्षसंघटना मजबूत करणार आहे. काळे यांच्या निवडीचे पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे, जिल्हा अध्यक्ष उमेश गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष पद्मिनी शेवडे,जिल्हा सरचिटणीस श्रीमंत आठवले, रंगनाथ सरवदे, वैशाली सावंत, मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान भोसले, पंढरपूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे, रामदास धाइंजे, वैशाली चंदनशिवे आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







