आशिया चषक मध्ये भारताचा पाकिस्तान वर 5 गडी राखून दणदणीत विजय*
युएईमध्ये आशिया चषकाचा दुसरा सामना प्रतिस्पर्धी कट्टर विरोधक भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला आहे. पाकिस्तानने भारतासमोर 20 षटकांत 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने 147 धावांचा पाठलाग करत अखेर पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 5 गडी राखून विजय मिळवला. भारताने पाकिस्तान संघासोबत जिंकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं 19.3 षटकात सर्वबाद 147 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. त्यानंतर इफ्तिखार अहमदला 28 धावांची खेळी करता आली. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, हार्दिक पांड्या तीन आणि अर्शदीप सिंहनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, आवेश खानच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली







