*मल्लसम्राट रावसाहेब मगर कुस्तीक्षेत्रातला अजिंक्यतारा*
कुस्ती आणि आमचं निमगाव हे अभ्येद्य नात आहे. इथल्या घराघरात एक पैलवान आहे. केवळ कुस्ती या नावामुळ आमच्या गावाला राज्यात ओळखतात. कित्येक नामवंत मल्ल निमगावमधील तालमीत घडले आहेत. आमच्या गावात महाराष्ट्र केसरी ते ऑल इंडिया चॅम्पियन अशे अनेक विजेते मल्ल गावात घडले. कुस्तीतील मिळालेल्या पदकांमुळे आज गावातील काही मुल भारतीय सैनदलात मध्ये तर काही पोलिस खात्यात आहेत. कुस्तीमुळ आज कित्येक कुटुंबांना समाजात मनाच स्थान मिळालंय. या सर्वांचं श्रेय जातं ते आम्हां सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे संघटक पै. रावसाहेब मगर (आप्पा)यांना.आप्पांनी कुस्तीसाठी त्यांचं आयुष्य वेचलं आहे. आप्पा स्वतः अतिशय चांगले पैलवान होते. राजर्षी शाहु महाराजांसारखी दिसणारी त्यांची बलदंड शरीरयष्टी विरोधी पैलवानाच्या मनात धडकी भरवत असे.कुस्ती हा खेळ टिकला पाहिजे म्हणून आप्पा स्वतः महाराष्ट्रातल्या कुस्ती मैदान भरविनाऱ्या आयोजकांचा कुस्ती मैदानात जाऊन फेटा बांधून प्रोत्साहनपर सत्कार करतात.आजपर्यंत आप्पांनी 3011 मैदानात जाऊन आयोजकांचा सन्मान केला आहे.मन मनगट आणि मेंदु या तीन शक्ती ज्याच्या बळकट तो आयुष्याची कुठलीच लढाई पराभूत होऊ शकत नाही.हीच शिकवण आप्पा आपल्या पैलवानांना देतात. म्हणून तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील पैलवान सुद्धा आप्पांना गुरुस्थानी मानतात.आमचेही वडील कुस्ती खेळायचे, आप्पांच्या तालमीत सराव करायचे. कुस्ती खेळत त्यातून मिळालेल्या पैशातून आमच्या वडिलांनी शिक्षण घेतलं आहे. पुढे सातारा शिक्षणासाठी सातारा येथे गेल्यानंतर तिथंही कुस्त्यांची अनेक मैदान जिंकली आमच्या वडिलांनी. कुस्तीमुळच ते शिक्षक झाले आता ते सेवा निवृत्तही झाले आहेत. आजही साताऱ्यात आमच्या वडिलांना मगर पैलवान म्हणून ओळखतात. आमच्या कुटुबाच्या प्रगतीत कुस्तीच फार मोठं योगदान आहे.आणि या कुस्ती च श्रेय जातं ते रावसाहेब आप्पांना.अशा कित्येक पैलवानांची कुटुंब प्रगतीपथावर आनण्यामागे आप्पांचे कष्ट आहेत.आज आप्पांनी आयुष्याची 72 वर्षे पुर्ण केली आहेत, आज जन्मदिनाच्या निमित्ताने आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तर आजही आप्पा एका गावातील कुस्त्याच्या मैदानात आहेत.असेहे हिमालया एवढी उंची प्राप्त करूनही मातीत रमणारे आमचे रावआप्पा..लालमातीसाठी आयुष्य वेचणाऱ्या व मातीतून हिरे निर्माण करणाऱ्या या ध्येयवेड्या मल्लसम्राटाला जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा.विक्रमसिंह मगर9970027070














