प्रोटीनचे प्रकार!
आपण मागील भागात सप्लीमेंट समज, गैरसमज याबद्दल माहिती जाणून घेतली. सप्लीमेंटमध्ये वेगवेगळे प्रकार असतात हे सुध्दा पाहिले. आता या अंकात आपण व्हे प्रोटीन, केसिन प्रोटीन, आयसोलेट प्रोटीन, हायड्रोलाईज्ड प्रोटीन, एग प्रोटीन अशी वेगवेगळी प्रोटीन्स पाहणार आहोत.व्हे प्रोटीनः यात प्रोटीन ७० ते ८० टक्के असून हे प्रोटीन स्वस्त आहे, पण यात लॅक्टोज आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्याने लॅक्टोजचा त्रास असणाऱ्यांना पचविणे अवघड जाते. तसेच यामध्ये इम्युनोग्लोबुलिन समाविष्ट असून याची बायोलॉजिकल व्हॅल्यू १०४ आहे. व्हे प्रोटीन आयसोलेटः यात ९० ते ९६ टक्के प्रोटीन असून हे व्हे कॉन्सन्ट्रेटपेक्षा महाग आहे. यात लॅक्टोज आणि चरबीचे प्रमाण कमीत कमी आहे. तर यात नाममात्र ट्रेस असू शकतात. सेन्सेटीव्ह पोट असलेल्या व्यक्तींचे पोट फुगण्याची शक्यता असते. याचे शरीरात जलद शोषण होते, परंतु हायड्रोलायज्डपेक्षा कमीच. याची बायोलॉजिकल व्हॅल्यू १५४ आहे. लॅक्टोज अजिबात पचत नाही आणि सरावण्याच्या टप्प्याशी जुळवून घेता येत नाही अशा व्यक्तींसाठी व्हे आयसोलेट निवडावे, अन्यथा कॉन्सन्ट्रेट निवडावे.व्हे प्रोटीन हायड्रोलायज्ड: हायड्रोलायज्डला व्हे प्रोटीनचे “पूर्वाग्रहित” स्वरूप मानले जाते. हे अतिशय वेगाने पचते. परंतु अतिशय महागडे असून याची चवही कडू असते. ज्यांनी व्यायामाआधी प्रोटीन घेतले नाही त्यांना हे व्यायामापूर्वी काही क्षणापूर्वी देता येते. तसेच ज्यांना भाजले आहे अशा पेशंटची वेगात सुधारणा व्हावी किंवा ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांना सहजपणे पचणारे हे प्रोटीन देणे आवश्यक आहे. इतर घटकांबरोबर व्हेची जोडी जमवल्यावर ते सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे प्रोटीन देते. आरोग्य आणि तंदुरूस्ती, फिटनेस याबद्दल विशेष उत्साह असणाऱ्यांना याचा चांगला फायदा आहे. वैद्यकीय क्षेत्रातही भाजणे, कॅन्सर, पोस्टिओपोरोसिस(हाडांचे विकार), हायपोथायरॉडिझम (थायरॉइडशी संबंधित विकार), ब्लड प्रेशर, हाय ट्रायग्लायसराइड (हृदयास घातक असा विकार), बोन मिनरल (हाडांमधील खनिजे), खूपच कमी असलेली घनता, नैराश्य आणि आणखी बऱ्याच विकारांचा त्रास होत असलेल्या व्यक्तींना याचा मोठा फायदा होतो. व्हे प्रोटीन किंवा आयसोलेट सकाळी उठताच पाण्यात घेतल्यावर आपल्या मसलचे कॅटाबोलिजम थांबेल व व्यायामानंतरही लगेच पाण्यातून घेतले तर फास्ट मसल रिकव्हरी होईल.प्रोटीन खाल्ल्यानंतर आपली डायजेस्टीव्ह सिस्टीम ते पेप्टाइड्समध्ये तयार करते, जे अमायनो ऍसिडच्या शॉर्ट चैन असतात. यापैकी सर्वात लहान म्हणजे di आणि tripeptides, फक्त 2 किंवा 3 अमायनो एसिड्स लहान आतड्यांद्वारे शोषले जाऊ शकतात आणि रक्तप्रवाहात सोडले जाऊ शकतात, त्यामुळे ते मसल तयार करण्यासाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि टिश्यूंची दुरुस्ती करण्यासाठी संपूर्ण शरीरात वाहून जाऊ शकतात.केसीन: दूधातले हे सावकाश पचणारे प्रोटीन असून यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. केसीन घेतल्यानंतर ते जेलच्या स्वरूपात आतड्यात रहात असल्याने शोषण्याची गती कमी होऊन ६-७ तास भूक लागत नाही. त्याला “अँटी कॅटाबॉलिक” असेही म्हणतात. ते उच्च प्रमाणात ल्युसीन प्रदान करते. केसीन झोपताना घेतले तर अतिउत्तम! जेव्हा केसीन प्रोटीन दूधातून व्हे, फॅट आणि लॅक्टोजपासून वेगळे केले जातात, तेव्हा मायसेलर केसीन तयार होते. केसीनचा हा सर्वात हळू कमी होणारा प्रकार आहे. कारण ते द्रवपदार्थात मिसळल्यावर मायसेल्स बनवते.व्हे प्रोटीन ब्लेंडसः हे प्रोटीन म्हणजे कॉन्सन्ट्रेट, आयसोलेशन व हायड्रोलाइज्ड यांचे मिश्रण असते. काही व्हे ब्लेंडसमध्ये थोड्या जास्त कार्ब्सचाही समावेश असतो. या ब्लेंडसचा पचनाचा वेग अधिक मंद असतो. त्यामुळे इतर कोणत्याही प्रोटीनचा स्त्रोत सहजपणे उपलब्ध नसेल तर अशा वेळी ब्लेंडसचा उपयोग करणे उत्तम! एग प्रोटीन सप्लीमेंट व्हे आणि केसीन प्रोटीनप्रमाणेच एग प्रोटीन सप्लीमेंट सुध्दा उपलब्ध असतात. एग व्हाईट प्रोटीन अल्बूमेन सप्लीमेंट पॉवर फॉर्ममध्ये उपलब्ध असते. मसलगेन करणारी सर्व आवश्यक अमायनो एसिड एग प्रोटीनमध्ये असल्याने प्रोटीनची गुणवत्ता अतिशय चांगली असते. हे एक वेगाने पचणारे प्रोटीन असून सुध्दा इतके महाग नाही. त्याचप्रमाणे ते पचवायला व शरीरात मिसळ्याच्या दृष्टीने अतिशय सोपे असते. ज्यांना व्हे आणि केसीन पचायला अवघड असते, अशांसाठी उत्तम आहे. ते पाण्यात मिसळण्याच्या दृष्टीने जरा जड असते. तसेच एकदा शेक केल्यावर त्याला थोडा अंड्याचाही फ्लेवर असतो. वास्तविक पाहता सदरची प्रोटीन्स ही दूधापासून व अंड्यापासून बनविलेली असून यामध्ये कसलेही स्टेरॉइड नसते. त्यामुळे गैरसमज करून न घेता शक्य असेल तर व्यायाम करणाऱ्यांनी ही प्रोटीन्स घ्यावीत. मात्र आपले वजन व उंची याचे कॅल्क्युलेशन करून शरीराला जितके प्रोटीन हवे तितकेच घ्यावे. पुढच्या भागात मिल रिप्लेसमेंट पावडर, वेट गेनर, बीसीएए, ग्लुटामाईन, क्रिएटीन, आर्जिनिन याबद्दल पाहू या.
गौतम भंडारे, फिटनेस ट्रेनर अँड न्युट्रीएशनिस्ट, आयएफएसआय इन्स्टिट्युट, पुणे मो. 9529602295 / 7498827350







