माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज येथे स्व. विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण.स्व. विनायक मेटे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – उत्तमराव माने
अकलूज / प्रतिनिधी 14 ऑगस्ट रोजी शिवसंग्राम चे नेते व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झाले कायमच बहुजन समाजाला सोबत घेऊन मागासलेल्या मराठा समाज बांधवांसाठी काम करणाऱ्या संघर्षशील सामाजिक नेतृत्वाचे अस अचानक जाण्याने मराठा समाजाबरोबर बहुजन समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायमच आक्रमक असणाऱ्या स्व विनायक मेटे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे मत मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे यांनी व्यक्त केले माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज येथे रविवार दि 22 रोजी स्व विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणाऱ्या शोकसभेत ते बोलत होते यावेळी विचारपीठावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय माने- साखळकर, डॉ. विश्वास कदम, मराठा क्रांती मोर्चा माळशिरस तालुका समन्वयक निनाद पाटील ,भैय्या कोडग,पत्रकार गणेश जाधव,राजू मिसाळ ,दिगंबर मिसाळ ,रणजीतसिंह कदम, तुकाराम साळुंखे ,गौतम भंडारे ,रघुनाथ साठे, अमर रिसवडकर, धनंजय शिंदे पाटील, बबनराव शेंडगे ,डॉ कोडग,अमोल चिकणे,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रिया नागणे, वनिता कोरटकर आदी बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित बहुजन समाज बांधवांच्या वतीने डॉ विश्वास कदम यांनी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली याबरोबरच मागील दोन महिन्याच्या कालावधीत निधन झालेले ज्ञात अज्ञात सर्व बहुजन बांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वय धनंजय माने साखळकर यांनी स्व विनायक मेटे यांचा घात होता की अपघात ? असा सवाल उपस्थित केल्याने स्व विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल संशय व्यक्त केला जात असून याची सखोल चौकशी व्हावी अन्यथा मराठा समाज स्वस्थ बसणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी गौतम भंडारे, दिगंबर मिसाळ, बबनराव शेंडगे, प्रिया नागणे ,निनाद पाटील आदींनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळशिरस तालुका समन्वयक निनाद पाटील यांनी केले .







