मेडिकल औषधाचे बिल दिले नाही. नातेपुते येथील गांधी मेडिकल विक्रेत्याचा परवाना रद्द.करमाळ्यातील ग्राहकाने केली होती तक्रार.
अकलूज (प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील गांधी मेडिकल या दुकानातून मेडिसिन खरेदी केल्यानंतर रीतसर पावती ग्राहकाने मागितली.मात्र मेडिसिन ची पावती देण्यास मेडिसिन विक्रेत्याने नकार दिला. या विरोधात ग्राहकाने अन्न प्रशासन औषध विभाग सोलापूर याकडे लिखित तक्रार केल्यानंतर या तक्रारीची चौकशी होऊन गांधी मेडिकल नातेपुते या मेडिकल दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची लेखी आदेश अन्न औषधी विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव यांनी दिले आहेत.करमाळा येथील नासिर कबीर हे आपल्या नातेवाईकांना घेऊन नातेपुते येथील दवाखान्यात गेले होते. त्या दवाखान्याच्या चिट्ठीनुसार गांधी मेडिकल मधून औषध घेतल्यानंतर त्या दुकानदाराला औषधाचे पक्के बिल मागितले. याचे बिल देण्यास संबंधित दुकानदारांनी नकार दिला.या प्रकाराबाबत नासिर कबीर यांनी औषधी अन्न प्रशासन विभाग सोलापूर यांच्याकडे लिखित तक्रार केली या तक्रारीची औषध निरीक्षक सचिन कांबळे यांनी केली. या चौकशीत तथ्य आढळल्यानंतर गांधी मेडिकल नातेपुते या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचा आदेश अन्न औषधी विभागाने 18 ऑगस्ट 2022 रोजी पारित केला आहे.औषध विक्रेते व डॉक्टर लोक संगणमताने मेडिसिन विक्रीच्या माध्यमातून रुग्णांची प्रचंड लूट करत असल्याच्या अनेक वारंवार तक्रारी येतात.ठराविक कंपनीची तिप्पट चौपट जास्त दराची औषधे रुग्णांच्या गळ्यात घातली जातात.सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के औषध विक्रेते ग्राहकांना बिल देत नाहीत.बहुतांश डॉक्टर सुद्धा औषधाचा मूळ घटक न लिहिता ज्या कंपनीशी लागेबांधे अशा कंपनीचे ब्रँड नावाने औषधे देतात.नाईलाजाने रुग्णांना अशी औषधे खरेदी करावी लागतात. अशा वेळी बिल देणे दुकानदार टाळतात.माळशिरस तालुक्यातील बहुतांश मेडिकल मधून डॉक्टरांच्या चिठी शिवाय औषधे दिली जात आहेत. त्यामुळे अशा मेडिकल वर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.यामुळे आता या कठोर कारवाईमुळे मेडिकल विक्रेते ग्राहकांना बिल देतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे.







