*महिलांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा.सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील.*
संग्रामनगर दि.२० (केदार लोहकरे याजकडून)आज समाजात महिलांना सगळीकडेच विविध क्षेत्रात कार्य करण्याची संधी प्राप्त होते आहे तरी या मिळालेल्या संधीचा उपयोग महिलांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा असे उद् गार सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील यांनी काढले त्या आज शिवरत्न बंगल्यावर वाघोली (ता.माळशिरस) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.वृषाली माने व उपसरपंचपदी पंडित विठ्ठल मिसाळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ.मोहिते पाटील याच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,धैर्यशील मोहिते पाटील,सौ.शितलदेवी मोहिते पाटील व स्वरूपाराणी मोहिते पाटील उपस्थित होते. वाघोली ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती.त्यात योगेश दिगंबर माने व इतर मान्यवर यांच्या नेतृत्वात खंडेराया ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे ११ पैकी ८ उमेदवार बहुमताने निवडून आलेले होते.सरपंच व उपसरपंचपदाची निवड होऊन त्यात सरपंचपदी सौ.वृषाली योगेश माने यांचा तर उपसरपंचपदी पंडित विठ्ठल मिसाळ यांची एकमताने नुकतीच निवड झाली आहे.त्या बद्दल शिवरत्न बंगल्यात सरपंच,उपसरपंच नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माळशिरस पंचायत समिती माजी सदस्य विठ्ठल रामचंद्र पाटील माजी चेअरमन विष्णू वासुदेव मिसाळ वसंत कृष्णा मिसाळ,उत्तमराव माने,कालिदास कृष्णा मिसाळ,हरिदास कृष्णा चव्हाण,विलास मिसाळ,हरिदास बाबू मिसाळ,मारुती चांगदेव मिसाळ,अप्पासाहेब युवराज मिसाळ,सुरेश सर्जेराव पवार,पोपट भानुदास मिसाळ,मोहन विठ्ठल शेंडगे,संजय वसंत मिसाळ,दिगंबर माने,सुनील माने,बळीराम मिसाळ,रघुनाथ मिसाळ,अनंता श्रीरंग मिसाळ,हरिदास पाटोळे,निलेश शेंडगे,गणेश शेंडगे विजय शेंडगे,सौदागर पाटील,विवेक चव्हाण,प्रवीण पाटील,उत्तरेश्वर मिसाळ,राजेंद्र कोंडीबा मिसाळ बाबुराव मिसाळ,पताळे पाटील व सर्व ग्रामस्थ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











