माढा तालुक्यातील मानेगाव येथे बूथ सशक्तिकरण अभियान अंतर्गत जिल्हा परिषद गटाची बैठक खा. रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )माढा तालुक्यातील मानेगाव येथे बूथ सशक्तिकरण अभियान अंतर्गत जिल्हा परिषद गटाची बैठक 19ऑगस्ट रोजी दुपारी विठ्ठल मंदिर मानेगाव येथे माढा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर,सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य शितलकुमार जोकार यांनी केले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने खासदार निधीतून जंगम आडाजवळील महादेव मंदिरसाठी सभामंडप,जिल्हा नियोजन मधून मानेगाव मुख्य स्मशानभूमीत सीमेंट काँक्रीट निवारा शेड व संरक्षक भिंत,मानेगाव मधील पालखी मिरवणूक मार्ग सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यासाठी निधी मिळावा.अशा मागण्या करण्यात आल्या.मानेगाव येथील व्यायाम शाळा दुरुस्ती साठी खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी तात्काळ 2लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी संतोष पाटील, शिवाजीराजे कांबळे,योगेश बोबडे, जयसिंग ढवळे पाटील,भारत नाना पाटील, जयकुमार शिंदे,सुभाष इंदलकर, विलासराव देशमुख,खैराव.शितलकुमार जोकार ग्रा पं सदस्य,अनिल नाना भेंडकर, बिरुदेव शेळके,प्रशांत देशमुख,आलम जमादार,अमोल नाईकवाडी,नारायण मोटे, दीपक देशमुख,प्रतापराव देशमुख, सत्यवान लटके,केवड बालाजी नाईकवाडी,अमोल देशमुख,सचिन उदागे, माया माने, संध्या कुभेजकर, नितीन शिंगाडे आदी उपस्थित होते.उपस्थित नागरिकांचे आभार बिरूदेव शेळके यांनी मानले.








