शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माळशिरस तालुका सकल मराठा यांचे वतीने अकलूज येथे 21ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन.
अकलूज (प्रतिनिधी ) माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवां बरोबरच सर्व समाज बांधवांनी रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वा शासकीय विश्रामगृह अकलूज या ठिकाणी शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केली आहे. तरी माळशिरस तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी शासकीय विश्रामगृह अकलूज येथे रविवार दिनांक 21 रोजी सकाळी 10 वा वेळेवर उपस्थित राहावे.तसेच शोकसभा वेळेवर होणार आहे.तरी या शोकसभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन माळशिरस तालुका मराठा सेवा संघ, मराठा क्रांती ठोक मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा ,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड .यांच्या वतीने करण्यात आले आहे.







