राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा 21ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा !माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, आधुनिक काळाची जाणीव, शेती प्रश्नांसह इतर सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, सजग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकीक आहे.वयाच्या 22 व्या वर्षी हर्षवर्धन पाटील यांनी शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून संचालकपदावर काम करण्यास सुरवात केली. 1995 साली अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवून ते भरघोस मतांनी विजयी झाले. समाजामध्ये राजबिंडे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची नवीन ओळख सुरू झाली.(स्वर्गीय) शंकरराव पाटील भाऊंच्या कार्याचा वारसा व इंदापूर येथील जनतेच्या आशीर्वादामुळे राज्यातील अपक्ष आमदारांचे गटनेते झाले. व युतीच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 1999 ते 2009 पर्यंतच्या निवडणुकीमध्ये सहज विजय मिळवला. राज्यातील सहा मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची खास मैत्री होती.इंदापूर तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. राजकीयदृष्ट्या घराण्याची परंपरा होती तरी संघर्षही तितकाच त्यांना करावा लागला रूबाबदार आणि देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्याच्या राजकारणात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.त्यांच्या तीन शिक्षण संस्था देखील आहेत.हर्षवर्धन यांनी बावडा (ता. इंदापूर) या आपल्या गावातून राजकारणाला सुरवात केली. नंतर ते पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य झाले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडून आले. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना तेव्हाच्या शिवसेना-भाजपच्या युतीच्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. 1995 पासून 2014 पर्यंत त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. या 25 वर्षांतील दोन वर्षांचा अपवाद वगळला तर त्यांच्याकडे सदैव “लाल दिवा’ होता. सहकार, पणन, रोजगार हमी, विधिमंडळ कामकाज अशी खाती त्यांनी तडफेने सांभाळली.मनोहर जोशी ते पृथ्वीराज चव्हाण अशा 25 वर्षांतील प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. अशी कामगिरी असणारे राज्याच्या राजकारणात फारच कमी मंडळी असतील. कर्मयोगी, नीरा भीमा या दोन साखर कारखान्यांची धुरा ते सांभाळत आहेत.


आज त्यांच्या 58व्या वाढदिवसाच्या निमित्त वसंतदास शहा, कमलेश शहा, निलेश शहा व शहा परिवाराकडून पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.







