अकलूज येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लढाऊ पॅंथरचा सन्मान
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्रात दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात दलित पँथर या लढाऊ संघटनेने 1972 ते 2022 का कालावधीत जे योगदान देऊन दलित समाजाचा लढा उभा केला होता तो कधीही विसरता येणार नाही. म्हणून या संघटनेला ५० वर्षे पूर्ण होत असतानाच सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून जुन्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करणे व नव्या तरूणांना या चळवळीची जाणीव करून देणे यासाठी साप्ताहिक बंडखोर व अन्नपूर्णा बहुउद्देशिय संस्था यांच्या वतीने अकलूज येथे दलित पँथरमध्ये सर्वस्व झोकून अन्याय ,अत्याचाराविरोधात लढलेल्या लढाऊ पँथर्सचा सन्मान सोहळा आयोजित केला. अकलूज येथील साप्ताहिक बंडखोर व अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अकलूजचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ पॅंथर्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी दयानंद धाईंजे, उमेश तोरसकर, एन. के. साळवे, तुकाराम बाबर, शामराव भोसले, शाहीर राजेंद्र कांबळे, भारत आठवले, नागेश सरवदे, दयानंद कांबळे, बी. टी. शिवशरण, सुभाष कांबळे, लक्ष्मण दगडे, सिध्दार्थ जगताप, चंदू खंडागळे, संजय खंडागळे, सुभाष मागाडे, दिलीप ओरसे, प्रकाश रणपिसे, कुंडलिक साठे, राजाभाऊ खिलारे, विठ्ठल गायकवाड, भगवान काटे, तुकाराम केंगार, दिलीप बनसोडे, महेश शिंदे, बंडू कांबळे, सुभद्रा तिकोटे, विठाबाई गेजगे, शारदा जगताप आदि लढाऊ पॅंथर्सचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील,श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी,साप्ताहिक बंडखोर चे संपादक गौतम भंडारे,भीमराव चंदनशिवे, डॉ. कुमार लोंढे आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.








