*पावसाची रिमझिम आणि तिरंगामय वातावरणात अकलूज येथे देशप्रेमीची बाईक रॅली संपन्न!*
अकलूज (प्रतिनिधी )स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अकलूज येथे विविध भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यातीलच एक भाग म्हणून 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष मा. जयसिंहजी मोहिते पाटील साहेब व कार्याध्यक्ष मा.धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यामधे समितीचे कार्याध्यक्ष मा.संग्रामसिंहजी मोहिते-पाटील साहेब यांच्यासह हजारो दुचाकी स्वार सहभागी झाले होते. पावसाची रिमझिम आणि त्यामध्ये तिरंगामय वातावरण यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.दि.९ ऑगस्ट रोजी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शंकरराव मोहिते महाविद्यालय ,महाविद्यालयाचे गाळेधारक,औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय,शंकरराव मोहिते-पाटील इंजीनियरिंग काॅलेज व शिवरत्न नाॅलेज सिटी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. ही रॅली शंकरराव मोहिते महाविद्यालया पासून सुरू होऊन प्रतापसिंह चौक ,आंबेडकर चौक,जुने बसस्थानक, गांधी चौक,सदुभाऊ चौक,महर्षी चौक प्रतापसिंह चौक मार्गे पुन्हा शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे समाप्त झाली. या रॅलीत अनेक मान्यवर सहभागी झालेले दिसत होते. या तिरंगा रॅली मुळे प्रत्येकाच्या मनात देश प्रेमाची भावना जागृती झाली. यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते.











