ग्रामस्थांना स्वस्त धान्य वेळेवर देण्याची मागणीसामाजिक कार्यकर्ते निलेश सरतापे यांची मागणी
अकलूज (प्रतिनिधी)माळशिरस तालुक्यातील पठाण वस्ती येथील रेशन दुकानदार ग्रामस्थांना वेळेवर धान्य देत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निलेश दुर्योधन सरतापे यांनी केली आहे.याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, येथील स्वस्त धान्य दुकानदार ग्रामस्थांना वेळेवर स्वस्त धान्य देत नाहीत . सदर रेशन दुकानामध्ये रेशन माल असताना सदरील माल दोन तीन दिवस ग्राहकांना न देता तसेच ठेवतात . तसेच ग्राहंकाकडून फक्त मशिनवर अंगठे घेतात व दोन तीन दिवसानंतर माल देतात व सदर माल घेतल्याची पावती सुध्दा देत नाहीत . तसेच सदर माल ग्राहकांना अंगठे देण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी २.०० वाजेपर्यंत थांबावे लागते . मागील जुलै महिन्यात निम्म्याच लोकांचे धान्य दिलेले आहेत . तसेच निम्मे लोकांना स्वस्त धान्य दिलेले नाही . सदरील रेशन दुकानदार हा दुकान महिनाभर चालू न ठेवता महिन्यातील २ ते ३ दिवसच चालू ठेवतो . त्यामुळे लोकांना दुकान चालू असेल त्यावेळी स्वतःचे काम सोडून उपाशीपोटी सकाळी ७ वाजलेपासून दुपारी १ वाजेपर्यंत थांबावे लागते . सदरील स्वस्त धान्य कार्डधारकांचे हक्काचे असूनही त्यांना सदरील धान्य भांडून घ्यावे लागते . तरीही रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नाहीत . समस्त रेशनकार्ड धारक रेशन दुकानदारांना फोन वरून संपर्क केला असता रेशन दुकानदार मशिनमध्ये तांत्रिक अडचण सांगून स्वस्त धान्य देण्यास टाळाटाळ करीत असतात . याशिवायही मोफत धान्य विषयीच्या अनेक तक्रारी या दुकानदारासंदर्भात आहेत याबद्दल ग्रामसभेतील अधिकाऱ्यांना सूचना केली असता अद्यापी त्याच्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. तरी त्वरित संबंधित दुकानदाराची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सरतापे यांनी तहसीलदार माळशिरस यांच्याकडे केली आहे.सदर प्रकरणी त्वरित न्याय मिळाल्यास ग्रामस्थांच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयावर आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी निलेश सरतापे यांनी बोलताना दिला.






