*महषिॅ संकुल यशवंतनगर येथे क्रांतीदिन उत्साहात साजरा* अकलूज (प्रतिनिधी )हर घर तिरंगा जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महषिॅ संकुल यशवंतनगर येथे भारतीय स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी सैनिक संभाजी पवार ,बाळासाहेब पाटील व प्रशाला समितीचे सभापती नितीनराव खराडे याच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी केले.देशाच्या स्वातंञ्य चळवळीला निर्णायक दिशा देणारा दिवस म्हणजे क्रांतीदिन या दिवसाची माहिती सांगितली. अमृतमहोत्सवा निमित्त माजी सैनिकाचा सत्कार प्रशाला समिती सभापती नितीनराव खराडे याच्या हस्ते करण्यात आला. प्राथमिक विभागातील बालचमूनी क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारल्या राणी लक्ष्मीबाई-सई लोखंडे,ज्ञानेश्वरी कोठगार लोकमान्य टिळक-सान्वी गायकवाड नेताजी सुभाषचंद्र बोस-अनन्या बनकर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू-अर्जन लोखंडे, उत्कर्ष चव्हाण,शंभूराजे चव्हाण महात्मा गांधी-सोहम एकतपूरे सावकर-वेदांत सकट या विद्यार्थीनी वेशभूषा साकारल्या. यशवंतनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सत्यशीलभैय्या मोहिते पाटील यांनी बालचमूना खेळणी वाटत करून त्याचा आनंद द्विगुणित केला संकुलातील विद्यार्थीनी कु.समृद्धी बाबर,श्रावणी मोहिते यानी भाषणे केली सहशिक्षक ईलाही बागवान यांनी क्रांतीदिनाचे माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने महत्त्व सांगितले प्रमुख पाहुणे माजी सैनिक संभाजी पवार यांनी कारगिल युध्दातील आठवणी सांगून विद्याथीॅना सैन्यात भरती होण्याचे आव्हान केले. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच प्रशालेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव, विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन नाझिया मुल्ला व किरण सुर्यवंशी यांनी केले आभार पर्यवेक्षक अंकुश एकतपूरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सारे जहाॅसे अच्छा समुहगीतने झाली.









