अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याच्या नावाने फोन करून माळशिरस तालुक्यातील अनेक मेडिकल मालकांना धमकाऊन पैशांची मागणी.कोण आहे हा तोतया चंद्रकांत मगदूम?
अकलूज (प्रतिनिधी )हॅलो, अमुक -तमुक मेडिकल चे मालक बोलताय का? मी मुंबई वरून हेड ऑफिस मधून ड्रग इन्स्पेक्टर चंद्रकांत मगदूम बोलतोय. तुमच्या मेडिकल ची तक्रार आमच्याकडे हेड ऑफिस ला आली आहे. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी मला मंत्रालय मधून कॉल आला आहे. आपल्या मेडिकल वर कारवाई होऊन आपले मेडिकल बंद होऊ शकते. आमच्या टीम ने दोन दिवसापूर्वी सोलापूर मधील एक मेडिकल बंद केले आहे. तुम्ही ताबडतोब तडजोड करून 9ते 10हजार रुपये ऑनलाईन पाठवा. हा इशू फार मोठा होऊ शकतो.तुमच्या शहरातील पोलीस स्टेशनला फोन करून तुम्हांला कायदेशीर नोटीस पाठवतो.असे म्हणत माळशिरस तालुक्यातील अनेक मेडिकल चे मालक यांना फोन करून पैशांची मागणी केली जात आहे. त्यामुळे मेडिकल वाले त्रस्त झाले आहेत.तुम्ही तडजोड करणार नसाल तर हा इशू वाढवतो. तुम्ही तडजोड केली तर वाढवत नाही. असे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अनेक मेडिकल च्या ओनर ला फोन करून मेडिकल च्या मालकाकडून 9ते 10हजार रुपये मागणाऱ्या दोन व्यक्तीचे संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून, हा चर्चेचा विषय बनला आहे.याबाबत सविस्तर माहिती घेतली असता, हा कॉल साधारणपणे दीड महिन्यापूर्वी करण्यात आला आहे. कॉल केल्यानंतर मेडिकल वाले यांनी संबंधित व्यक्तीला मी तुम्हांला आमच्या पार्टनर ला विचारून सांगतो. असे सांगितले. तसेच माझी तक्रार कोणी आणि कोणाकडे केली आहे. यासंदर्भात मला अद्याप कोणतीही नोटीस आली नाही. यावर या महाशयांनी ते महत्वाचे नाही. असे सांगत तुम्ही पैसे पाठवा. असे सांगितले.या संदर्भात अधिक माहिती घेतली असता,सदर व्यक्तीने माळशिरस तालुक्यातील अनेकांना असे फोन केले आहेत. तर काहींनी घाबरून पैसे देखील दिले आहेत.प्रत्येक वर्षी मेडिकल ची तपासणी करण्याच्या नावावरून जिल्ह्याच्या ड्रग इन्स्पेक्टर चे नाव पुढे करून हे महाशय तालुक्यातील प्रत्येक मेडिकल कडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. नवीन मेडिकल सुरु करण्यासाठी तसेच परवाना नूतनिकरण करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर वसुली केली जात आहे.तसेच इतरही अनेक कारणासाठी मेडिकल च्या मालकांना वेठीला धरून वसुली केली जात आहे. यासंदर्भात तालुक्यातील काही मेडिकल चे मालक यांना विचारले असता, त्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.दरम्यान हे फोन नेमके कोण करीत आहे. याचीही चर्चा तालुक्यात रंगली आहे.सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन संबंधित व्यक्तीची चौकशी होऊन तोतया ड्रग इन्स्पेक्टर म्हणून बतावणी करून मेडिकल च्या मालकांना फोन करून बनवेगिरी करून पैसे उकळणाऱ्या या तोतया ड्रग इन्स्पेक्टर वर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
*माळशिरस तालुक्यातील मेडिकल च्या मालकांना जर अशा स्वरूपाचा फोन येऊन त्यांना पैशाची मागणी कोण करीत असेल तर त्यांनी 7841847458 या नंबर वर संपर्क साधावा.*







