• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

राऊतनगर (अकलूज )येथील दत्तनगर -2अंगणवाडीत माळीनगर बिट -2च्या वतीने स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा.सोशल मीडिया फौंडेशन ने केलेल्या सुशोभीकरणाचे उदघाटन.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 8, 2022
in शैक्षणिक
0
राऊतनगर (अकलूज )येथील दत्तनगर -2अंगणवाडीत माळीनगर बिट -2च्या वतीने स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा.सोशल मीडिया फौंडेशन ने केलेल्या सुशोभीकरणाचे उदघाटन.
0
SHARES
231
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राऊतनगर (अकलूज )येथील दत्तनगर -2अंगणवाडीत माळीनगर बिट -2च्या वतीने स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा.सोशल मीडिया फौंडेशन ने केलेल्या सुशोभीकरणाचे उदघाटन.

अकलूज (प्रतिनिधी )स्तनपानाच्या सध्याच्या पद्धती सुधारण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी जागतिक मोहीम म्हणून यंदाही १ ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने संबंधित विभागांना कळवले आहे. यंदाच्या जागतिक स्तनपान सप्ताहासाठी स्तनपानाच्या प्रगतीचे पाऊल : शिकवुया आणि आधार देऊया ही थिम निश्चित करण्यात आली आहे.जागतिक स्तनपान सप्ताह सक्षमपणे राबवण्यासाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. या वर्षीची संकल्पना आणि देशभरातील स्तनपानाची सद्यःस्थिती लक्षात घेता स्तनपानाची सुरुवात करण्यासाठी आरोग्य सेवा देणाऱ्यांची क्षमता वाढवणे व सामान्य आणि सीझेरीयन प्रसुतींमध्ये कोलोस्ट्रम फीडींगचा वापर या मुख्य बाबींवर लक्ष केंद्रीत करुन स्तनपान सप्ताह साजरा करण्यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. बाळाला पहिले ६ महिने फक्त स्तनपान व त्याचे महत्व आणि ६ महिन्यांनंतर २ वर्षे वयापर्यंत किंवा त्यानंतरही स्तनपान सुरू ठेवणे या विषयी प्रचारात्मक उपक्रमांचे आयोजन देखील केले जाणार आहे. या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील राऊतनगर -दत्त नगर येथील अंगणवाडी क्र.2येथे माळीनगर बिट -2च्या वतीने एकात्मिक बालविकास चे प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका रंजना कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये 8ऑगस्ट रोजी सकाळी 11वाजता स्तनपान सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुणे येथील सोशल मीडिया फौंडेशन चे अध्यक्ष पैगंबर शेख यांनी दत्तनगर येथील अंगणवाडी चे केलेले सुशोभीकरण याचेही उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पर्यवेक्षिका रंजना कदम यांनी सांगितले की,स्तनपानाचे माता आणि बालकाच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. स्तनपानामुळे स्तन कर्करोगाचे प्रमाण कमी होते.तसेच गर्भधारणेआधीची शरीरयष्टी पुन्हा मिळवणे अधिक सोपे होते. आई आणि बाळाचे नाते दृढ होण्यास मदत होते. स्तनपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोत्तम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्व, प्रथिने, आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाप असते. त्यात बरीच प्रतिबंधात्मक द्रव्ये असतात. ज्यामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढीस लागते आणि बाहेरील जंतुसंसर्गांपासून, अॅलर्जी यांसारख्या रोगांना प्रतिकार करणे शक्य होते.या दुधामुळे अस्थमा व दमा होण्याची शक्यता फार कमी होते. स्तनपानामुळे मुलांच्या मेंदूचा विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमताही उंचावते. स्तनपान हे अर्भकाच्या विकासातील सर्वोत्तम दुवा ठरते,त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,मूल आईच्या गर्भात असताना पालकांनी मुलाशी बोलले पाहिजे. त्यामुळे बालकाच्या मेंदूचा विकास होतो.बाळ जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बाळाला चिकाचे दूध पाजले पाहिजे.त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती वाढते. बाळाला किमान सहा महिने फक्त आईचे दूध पाजले पाहिजे. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला पूरक पोषण आहार दिला पाहिजे. बाळाचे लसीकरण नियमितपणे पूर्ण करून घ्यावे.

तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव च्या पार्श्वभूमीवर उपस्थित सेविका, महिला यांनी हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. व इतरांना देखील प्रेरित करावे.असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सोशल मीडिया फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष पैगंबर शेख यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,सोशल मीडिया फाउंडेशन हे मागील गेल्या 9 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक मदत पोहच होतेय. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक साहित्य वाटप असेल, शाळेची डागडुजी असेल, गरजू विद्यार्थ्यांची थकीत फि असेल अगदी मेसची फि असेल इथपर्यंत सोशल मीडिया फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना भरीव मदत केली जाते.संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.याप्रसंगी माळीनगर बिट -2च्या पर्यवेक्षिका रंजना कदम, सोशल मीडिया फौंडेशन चे अध्यक्ष पैगंबर शेख, राऊतनगर चे सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे,किशोर नाना ‌घोलप, रफिक शेख,अमोल गव्हाणे, आयशा शेख, सिस्टर शबाना तांबोळी मॅडम, प्रितीताई चव्हाण, महेंद्र अडगळे, बाळू वाघे, महावीर भोसले, तेजस उबाळे, विक्रम चौगुले, प्रदिप भोसले, अभिषेक खाडे, रोहित बोरावके, कबीर मुलाणी, रोहित कदम,ग्रामस्थ,माळीनगर बिट -2च्या सर्व सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तनगर -2च्या अंगणवाडी सेविका लता भिसे,मदतनीस ज्योती पवार,अंगणवाडी सेविका सायरा तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका अरुंधती हजारे यांनी केले.तर आभार अविनाश सोनवणे यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In