*ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
*मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.मनोरंजन विश्वातील प्रवास…प्रदीप पटवर्धन हे मुंबईतील गिरगाव परिसरात वास्तव्यास होते. कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय साकारण्यास सुरूवात केली होती. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका फार गाजली होती. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती.सिनेकारकिर्द प्रदीप यांनी एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला अशा अनेक चित्रपटातूनं भूमिका साकारली होती.दरम्यान, प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.







