हर घर तिरंगा विषयी जनजागृती साठी जि.प . सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचा बाभूळगाव ग्रामस्थांशी संवाद
अकलूज (प्रतिनिधी )भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त13 ते 15 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा या मोहिमे अंतर्गत माळशिरस तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाबद्दल व निमंत्रण देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी बाभुळगाव येथे भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले याप्रसंगी माळशिरस तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब तात्या पराडे पाटील तसेच शंकरराव पराडे पाटील, तानाजीबापू पराडे पाटील,पंडित पराडे पाटील,विनायक पराडे पाटील, अजित पराडे पाटील,प्रकाश पराडे पाटील,संभाजी पराडे पाटील तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रा अनिल पराडे पाटील यांनी केले तर बाळासाहेब पराडे पाटील संचालक शिवामृत दूध संघ अकलूज यांनी आभार मानले..









