


*अकलूज पोलीस ठाण्यातील सांळुखे,हांडे व देशमुख या तीन पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती* *आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केला सन्मान.*
अकलूज दि.7 प्रतिनिधी अकलूज शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे स.पो.उपनिरीक्षक सांळुखे,हांडे,व देशमुख या तीघांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे.
अकलूज पोलीस ठाण्यात स.पो.उपनिरीक्षक बबनराव श्रीपती सांळुखे , रामचंद्र विठ्ठल हांडे व तानाजी गुलाबराव देशमुख हे तीन पोलीस अधिकारी अतिशय सक्षमपणे आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. शासनाने त्यांच्या कामगिरी ची दखल घेवुन या तीघांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती दिलेली आहे. या तीघांची बढती झाल्याचे समजताच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या तीघांचा शाल.श्रीफळ ,गुच्छ देवुन सत्कार केला.वा भावी कामगिरीस शुभेच्छा दिल्या. या तिघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







