प्रसिद्ध उद्योजक श्री सुभाष थोरात यांचा अमृत महोत्सव सोहळा निमित्त माजी सैनिक सत्कार व सकाळ रिलीफ फंडस मदत देऊन साजरा करण्यात आला
इंदापूर (प्रतिनिधी )
भारतात सर्वत्र 75 वा अमृतमोहत्सव स्वांत्र्यदिन साजरा केला जात आहे याचे औचुत्या साधून प्रसिद्ध उद्योजक श्री सुभाष थोरात यांचा 75 वा वाढदिवस निमित्त श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर व प्रसिद्ध डॉ एम के इनामदार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठ वरती प्रमुख उपस्थित प्रसिद्ध डॉ एम के इनामदार साहेब होते.
सदर कार्यक्रमावेळी माजी सैनिकाचे देशाविषयी केलेले कार्याचे कौतुक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी सकाळ रिलीफ फंडास मदत देण्यात आली.
सदरवेळी श्री गुरु बापूसाहेब महाराज व डॉ एम के इनामदार यांनी समाजाप्रती केलेले काम पाहून यांचा सुवर्ण मुद्रा देऊन सत्कार करण्यात आला.
श्री सुभाष थोरात यांनी सामाज्य प्रती दाखवलेले दातृत्व वाखन्या सारखे आहे असे प्रतिपादन श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांनी केले.
यावेळी श्री गुरु बापूसाहेब महाराज यांनी उपस्थितांना आवाहन केले की सर्वानी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा महोत्सव साजरा करावा.
सदर कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती.









