अकलूज येथील विकास नगर मधील विकास कामे न केल्यास नगर परिषदेतील कोणत्याही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फसणार —— ज्योतीताई कुंभार
अकलूज येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे विकास नगर येथील गोरगरीब जनतेचे मोठे नुकसान झाले असून कोणाचे घर पडले आहे तर कोणाच्या प्रापंचिक संसार अन्नधान्य पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत विकास नगर शेजारी असलेल्या ओढ्यामुळे प्रत्येक वर्षी या भागातील नागरिकांचे नुकसान होत आहे यासंदर्भात प्रशासना ला वारंवार तोंडी सांगून तक्रारी करून निवेदन देऊन सुद्धा या कडे दुर्लक्ष केले जात आहे मागील दोन-तीन महिन्यापूर्वी विकास नगर शेजारी वाहणाऱ्या चे ओढ्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याची मागणी नगर परिषदेकडे केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे नागरिकांना नुकसान सोसावे लागत आहे आजही या भागात पाहिले तर त्या ओढ्यात जलपर्णी मुळे इतकी अडचण निर्माण झाले असून हे समस्याचे आगार बनले आहे यासंदर्भात ओढ्याच्या कडेला असणाऱ्या नागरिकांना आपण गावठाण मधील जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन माळशिरसचे तहसीलदार यांनी दिले आहे तसेच या विकास नगर भागात काही ठिकाणी गटारी व रस्ते आहेत तर काही ठिकाणी नाहीत तसेच कचऱ्याच्या संदर्भात ही समस्या निर्माण होत आहे या परिसरात राहणारे नागरिक सकाळी 7 ते 8 वाजता कामावर जातात आणि घंटागाडी 9 वा. नंतर एकच वेळा येते त्यामुळे कचरा टाकण्याची समस्या निर्माण होत असून पूर्वीप्रमाणे नगरपरिषदेने जागोजागी कचराकुंड्या ठेवाव्यात अशी मागणी होत आहे या विकास नगर मधील नागरिकांच्या समस्या बाबत माळशिरसचे तहसीलदार यांना भ्रमणध्वनी वरून फोन करुन ही समस्या सांगितले असता ते म्हणाले की आपण वारंवार आम्हाला का टॉर्चर करता? जर नागरिकांच्या समस्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे मांडायच्या नाहीत का? हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत येत्या काही दिवसात या समस्यांचे निवारण न झाल्यास सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर सांगितले प्रमाणे कारवाई अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे ज्योतीताई कुंभारी यांनी सांगितले






