*मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले EWS आरक्षण रद्द*
मुंबई : मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले EWS आरक्षण हायकोर्टाकडून रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात फेल ठरल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्लूएस आरक्षण दिल होतं. मात्र आता हे आरक्षणही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं की, एसईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना EWS चे लाभ देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाचा आजचा निकाल अनपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयावर तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी म्हंटल आहे. दरम्यान, अद्याप निकालपत्र उपलब्ध झालं नसून उपलब्ध झाल्यावर यावर सविस्तर बोलेल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.







