डॉ. ऋषिकेश ताकवणे यांच्या दर्शन होमिओपॅथिक क्लिनिकचा उद्घाटन समारंभ संपन्न ….
अकलूज (प्रतिनिधी )दि. 31 जुलै 2022 रोजी खराडी, पुणे येथे डॉ. ऋषिकेश शरद ताकवणे व डॉ.सौ कविता शरद ताकवणे यांच्या दर्शन क्लिनिकचा उद्घाटन समारंभ होमिओपॅथीचे नेते डॉ. अरुण भस्मे सर यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. होमिओपॅथि शास्त्र हे सध्या काळाची गरज असून बाकीच्या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांमध्ये साईड इफेक्टचे प्रमाण जास्त असून कोणत्याही दुष्परिणामानाशिवाय काम करणारे एकमेव शास्त्र म्हणून होमिओपॅथीकडे पाहिले जाते त्यामुळे सर्वांनी होमिओपॅथिक शास्त्राचा अवलंब करत सर्व सामान्य रुग्णांपर्यंत होमिओपॅथी पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उद्घाटक होमिओपॅथीचे नेते मा.उपाध्यक्ष केंद्रीय होमिओपॅथिक परिषद,नवी दिल्ली डॉ.अरुण भस्मे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ आदित्य होमिओपॅथिक हाॅस्पिटल, पिंपरीचे सर्वेसर्वा डॉ.अमरसिंह निकम यांनी होमिओपॅथी मुळे अति दुर्धर आजार सुद्धा सहजरीत्या बरे होतात फक्त त्यासाठी शास्त्रशुद्ध उपचाराची गरज असल्याचे सांगत होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हनीमन यांच्या सिद्धांतानुसार जर डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय केला तर यश हे निश्चितच असून त्यांनी स्वतः बऱ्या केलेल्या व अतिदुर्गर आजारांवर होमिओपॅथिक उपचार केलेल्या केसेस सांगून, सर्वांनी होमिओपॅथीचाच वापर करावा असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचे सिनेट सदस्य डॉ.अमित भस्मे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे सदस्य डॉ. बाळासाहेब हरपळे, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय तायडे उपाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पवार, पुणे महिला होमिओपॅथिक विभागाच्या प्रमुख डॉ.नयना सोनवणे, होमिओपॅथिक तज्ञ डॉ.विवेक माळी, डॉ.स्वाती माळी,होमिओपॅथिक संघटनेच्या जिल्हा सदस्या डॉ.मनीषा दनाने,जुन्नर तालुकाध्यक्ष डॉ. दत्तात्रय डकोरे पाटील ,डॉ. राजेंद्र खेत्रे, जिल्हा सदस्य डॉ.राजेश तांगडे, जिल्हा सदस्य डॉ.जितेंद्र जाधव, डॉ.मयुर काकडे, डॉ.दत्ताञेय ढोबळे, डॉ.एच.के.देशमुख डॉ.सतीश जगदाळे , मयुरेश केळकर व ताकवणे परिवारावर प्रेम करणारी मंडळी यावेळी उपस्थित होते.प्रारंभी सर्वांचे स्वागत डॉ. ऋषिकेश शरद ताकवणे व डॉ.सौ कविता शरद ताकवणे मॅडम यांनी केले..




























