अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याच्या नावाने तोतया फोन करून अर्थ कारणासाठी मेडिकल मालकावर आणतोय दबाव..
अकलूज (प्रतिनिधी )हॅलो, अमुक -तमुक मेडिकल चे मालक बोलताय का? मी मुंबई वरून हेड ऑफिस मधून ड्रग इन्स्पेक्टर ****.****.बोलतोय. तुमच्या मेडिकल ची तक्रार आमच्याकडे हेड ऑफिस ला आली आहे. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी मला मंत्रालय मधून कॉल आला आहे. आपल्या मेडिकल वर कारवाई होऊन आपले मेडिकल बंद होऊ शकते. आमच्या टीम ने दोन दिवसापूर्वी सोलापूर मधील एक मेडिकल बंद केले आहे. तुम्ही ताबडतोब तडजोड करून 9ते 10हजार रुपये ऑनलाईन पाठवा. हा इशू फार मोठा होऊ शकतो.तुमच्या शहरातील पोलीस स्टेशनला फोन करून तुम्हांला कायदेशीर नोटीस पाठवतो.तुम्ही तडजोड करणार नसाल तर हा इशू वाढवतो. तुम्ही तडजोड केली तर वाढवत नाही. असे सोलापूर जिल्ह्यातील एका नामांकित तालुक्यातील मेडिकल च्या ओनर ला फोन करून मेडिकल च्या मालकाकडून 9ते 10हजार रुपये मागणाऱ्या दोन व्यक्तीचे संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून, हा चर्चेचा विषय बनला आहे.याबाबत सविस्तर माहिती घेतली असता, हा कॉल साधारणपणे दीड महिन्यापूर्वी करण्यात आला आहे. कॉल केल्यानंतर मेडिकल वाले यांनी संबंधित व्यक्तीला मी तुम्हांला आमच्या पार्टनर ला विचारून सांगतो. असे सांगितले. तसेच माझी तक्रार कोणी आणि कोणाकडे केली आहे. यासंदर्भात मला अद्याप कोणतीही नोटीस आली नाही. यावर या महाशयांनी ते महत्वाचे नाही. असे सांगत तुम्ही पैसे पाठवा. असे सांगितले.या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, हे महाशय सोलापूर जिल्ह्यातील एका नामांकित तालुक्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशीयेशन चे तालुका अध्यक्ष आहेत. एवढेच नव्हे, तर गेल्या कित्येक वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत. काही वर्षांपूर्वी तालुक्यातून एका सामाजिक कार्यासाठी गोळा केलेला निधी देखील या अध्यक्षानी हडप केला होता.प्रत्येक वर्षी मेडिकल ची तपासणी करण्याच्या नावावरून जिल्ह्याच्या ड्रग इन्स्पेक्टर चे नाव पुढे करून हे अध्यक्ष तालुक्यातील प्रत्येक मेडिकल कडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. नवीन मेडिकल सुरु करण्यासाठी तसेच परवाना नूतनिकरण करण्यासाठी देखील मोठ्या प्रणावर वसुली केली जात आहे.तसेच इतरही अनेक कारणासाठी मेडिकल च्या मालकांना वेठीला धरून वसुली केली जात आहे. यासंदर्भात तालुक्यातील काही मेडिकल चे मालक यांना विचारले असता, त्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.आम्हांला असे अध्यक्ष नकोच. असेही काहींनी सांगितले.सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन संबंधित तालुका अध्यक्ष यांची चौकशी होऊन तोतया ड्रग इन्स्पेक्टर म्हणून बतावणी करून मेडिकल च्या मालकांना फोन करून बनवेगिरी करून पैसे उकळणाऱ्या या तालुका अध्यक्षावार कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.क्रमशः -भाग -1.











