युवासेना राज्यपालांच्या वक्तव्या विरोधात आक्रमक..- राष्ट्रपती मोहदयांकडे करणार तक्रार..
अकलूज (प्रतिनिधी )हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या मराठी माणसाचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपालांना केंद्राने परत बोलावून घ्यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात युवासेनेची “”स्वाक्षरी मोहीम”” अभियान…! मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये “मुंबई व ठाणे मधील गुजराती व राजस्थानी गेली तर मुंबई आर्थिक राजधानी होऊ शकत नाही”असे वादग्रस्त विधान करून मराठी व इतर भाषिक यांच्यामध्ये वाद लावायचे, भाजपची राजकीय सुपारी घेऊन सुडाचे राजकारण करत करायचे हे राज्यपाल पदाला अशोभनीय आहे , देशाचा लाखो कोटी रुपये बुडवून जाणारे कोण आहेत ? हे विसरून जातात आणि मराठी माणसाच्या भावनांशी खेळून त्यांना कमी लेखात..? अश्या कृतीचा व वक्त्याव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया युवासेनेचे राज्य सह सचिव स्वप्नील वाघमारे यांनी स्वाक्षरी मोहीम दरम्यान दिली. सदर अभियान शिवसेना संपर्क कार्यालय, अकलूज येथे पार पडले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता (आबा) पवार, शिवसेना तालुका प्रमुख नामदेव (नाना ) वाघमारे , चंद्रकांत देवकर सर, अनिल बनपट्टे, किरण भांगे, प्रताप सरगर, सुधीर महाडिक, महादेव मोरे, चिराग व्होरा तसेच शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला.











