*बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूची ‘सुवर्ण’ कामगिरी*
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी (30 जुलै) रोजी भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. चानूने महिलांच्या 49 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. 22 व्या राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये मीराबाई चानूने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाईने स्नॅच राऊंडमध्ये 88 किलो वजन उचलले. तर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 113 किलो वजन उचलले. म्हणजेच सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिने एकूण 201 किलो वजन उचलले. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. 27 वर्षीय मीराबाईचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी त्याने गोल्ड कोस्ट (2018) मध्ये गेल्या वेळी सुवर्णपदक आणि 2014 (ग्लासगो) मध्ये रौप्य पदक जिंकले होते. मीराबाईशिवाय, मॉरिशसच्या मारी रानिवोसोआने दुसरे स्थान पटकावले तर कॅनडाच्या हानाह कामस्किनने कांस्यपदक पटकावले.







