*अकलूज येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.*
संग्रामनगर दि.२७ (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अकलुज शाखेच्या वतीने तसेच माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारताच्या 75 व्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी मुख्यालय माउंट आबू राजस्थान येथील राजयोगी ब्रह्मा कुमार छोटू लाल भाईजी सोलापुर उपक्षेत्र संचालिका ब्रह्माकुमारी सोमप्रभा बहनजी, संगीता दीदी बार्शी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ब्रह्मा कुमार छोटू लालभाईंनी सांगितले की,वर्तमान समय मेडिटेशन आनी ईश्वर ज्ञान ही काळाची गरज आहे त्यामुळे तनाव मुक्त आनंदी जीवन जगू शकता असे सांगितले ईश्वरीय काम मनापासून उमंग उत्साह केल्यास आनंदी जीवन होते. सोमप्रभा दिदींनी आश्चीवचन दिले अतिशय आध्यात्मिक वातावरण तयार झाले हजारों लोकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी शिवरात्रि बहन यांनी केले तरी सवॆ मान्यवरांचा सन्मान समारोह केला.









