अंगणवाडी सेविकांचा आक्रोश आंदोलन.पोषण ट्रॅकर अँप मोबाईल भरण्याची सक्ती बंद करणेबाबत आणि इतर मागण्यांसाठी माळशिरस पंचायत समिती वर विराट मोर्चा.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करा, मानधन नको वेतन द्या,सरकारी कर्मचारी करा, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना चार हजार पेन्शन सुरू करा ,प्रोत्साहन भत्ता मिळणेबाबत,अशा अनेक मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी२५जुलै रोजी माळशिरस सावतामाळी मंदिरापासून माळशिरस पंचायत समिती गेट समोर अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने आक्रोश आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.या वेळी महिलांनी लाल साडी परिधान केली होती, हातात विविध मागण्यांचे बॅनर होते,आणि हातात लाल झेंडे होते. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, ईस शासान पर हल्ला बोल, हमारी युनियन, हमारी ताकद, मागतो आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे आशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सुर्यमनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ कार्याध्यक्ष सुर्यमणी गायकवाड साहेब तालुका अध्यक्ष अनिता सावळकर उपाध्यक्ष कमल ठोंबरे सचिव सुजाता गोखले बिट प्रमुख ममताबी काझी ,छाया सूर्यवंशी सुलभा कुलकर्णी बेबीताई व सर्व बिटप्रमुख अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका माता भगिनी यांच्या सहकार्याने मोर्चा यशस्वी झाला. (अन्यथा बेमुद्दत संप करू. महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारने अंगणवाडी सेविका मानधनात वाढ करू असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येऊन अडीच वर्षे झाले तरी मागणी पूर्ण झाली नाही. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्ष केले. तीन तीन महिने मानधन होत नाही. महिला जीवन जगणार कशा, लवकरात लवकर मागणी पूर्ण न झाल्यास बेमुदत संप करणार. सुर्यमनी गायकवाड कार्याध्यक्ष)








