*राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय*मुंबई : आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, वीज दरात सवलत ते लोणार सरोवर संवर्धनासाठी निधीपर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश आहे.सरसकट नियमित कर्जफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. जलसिंचन म्हणजेच मध्यम आणि अतिउच्च योजना प्रती युनिटचा दर आता 1 रुपये 16 पैसे करण्यात आला आहे. ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनतील मुद्रांक शुल्क वेगवेगळ्या ठिकाणी रेडिरेक्नर प्रमाणे घेण्यात येते, ते आता एक हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच मोजणी शुल्कात देखील 50 टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे.पैठणमधील ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेलाही मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी 890 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. भातसा मुंब्री धरणासाठी देखील 1550 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील वाघूर योजनेला देखील 2288 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. मराठवाड्यातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळदी संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. राज्यातील 15 मेडिकल कॉलेजमध्ये 50 जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रत्येकी 24 कोटी रुपये शासनाचा वाटा आहे, तो देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे शासनाच्या तिजोरीत एकूण 360 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.लोणार सरोवरच्या विकासकामांना देखील मंजुरी देण्यात आली आहे. त्यास 359 कोटी देण्याचे शासनाने ठरवले आहे. गणपती आणि दहीहंडी उत्सवादरम्यान छोट्या छोट्या कारणांवरुन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा येणार आहे.https://letsup.app.link/XGOMP3S







