संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा अकलूज येथे 26जुलै रोजी उत्साहात साजरा.
अकलूज (प्रतिनिधी )संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा अकलूज येथे 26जुलै रोजी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज युवक संघटना अकलूज,श्री संत नामदेव महाराज प्रतिष्ठान अकलूज,श्री संत शिरोमणी नामदेव महाराज महिला मंडळ, अकलूज यांचे वतीने मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.पहाटे 6.00 वा. श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मूर्तीची महापूजा. गजानन ज्ञानेश्वर जवंजाळ आणि सौ.अश्विनी गजानन जवंजाळ या उभयंतांच्या हस्ते संपन्न झाली.सकाळी 7.00 वाजता उपस्थित असलेल्या भाविकांसाठी चहाआणि नाश्ता अल्पोपहार प्रवीण शंकरराव ढवळे यांचे वतीनेदेण्यात आला.सकाळी 7.45 वाजता वेळेवर अकलूज परिसरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.पालखीत सर्व समाज बांधवानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.या मिरवणूकीत पुरुषांनी पांढरा पायजमा कुर्ता आणि पांढरी गांधी टोपी असा पेहराव केला होता.तर महिलांनी भगवी साडी आणि फेटा असा पेहराव केला होता.पालखी मार्गावर असणाऱ्या समाजातील घरांनी पालखी स्वागतासाठी सुंदर सुबक अशी रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले.सकाळी 10.30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अकलूज येथे हभप श्री.विठ्ठल कंधारे महाराज(संग्राम नगर-अकलूज) यांचे सुश्राव्य किर्तन झाले.त्यानंतर दुपारी 12.00 वाजता गुलाल-फुलांचा तसेच महाआरती धार्मिक विधी संपन्न झाला.आरतीचा विधी संपन्न झाल्यानंतर श्रीमती रजनी ज्ञानेश्वर जवंजाळ,भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज चे गजानन जवंजाळ यांचे वतीने श्री संत नामदेव मंगल कार्यालय, शिवसृष्टी जवळ, अकलूज येथे महाप्रसाद वाटप करण्यात आला.महाप्रसादासाठी श्री संत नामदेव कार्यालय तसेच स्वयंपाकासाठी लागणारी भांडीइत्यादी ची उपलब्धता मकरंद श्रीनिवास जामदार यांचे वतीने करण्यात आली होती.या सोहळ्यानिमित्त आठवडाभर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धा तसेच सोहळ्या दिवशी टेबल, खुर्च्या, सतरंजी, समई आदी साहित्यदादा उर्फ पांडुरंग दत्तात्रय मुळे यांचे वतीने उपलब्ध करण्यात आले.सोहळ्या दिवशीचे मंदिराच्या आतील व मंदिरा बाहेरील आकर्षक डेकोरेशननामदेव प्रतिष्ठानचेअध्यक्ष अनिकेत गोंदकर आणि उपाध्यक्ष गणेश सटाले यांनी केले.आयोजित केलेल्या विविध स्पर्धा साठी दादा मुळे, अमोल जवंजाळ, विजयकुमार चांडोले, प्रवीण ढवळे, सौ.वैशाली पोरे, धनंजय पिसे, उदय उरणे सर, सचिन जवंजाळ, रणजीत जवंजाळ, सुजित जवंजाळ,वैभव जामदार, वै.सरोज अंचलकर यांचे स्मरणार्थ सौ.स्वाती अंचलकर यांचे वतीने बक्षिसे देण्यात आली.सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संत शिरोमणी नामदेव महाराज युवक संघटना अकलूज चे अध्यक्ष विजय देवळे ,उपाध्यक्ष संतोष सटाले श्री संत नामदेव प्रतिष्ठान अकलूज चे अध्यक्ष अनिकेत गोंदकर,उपाध्यक्ष गणेश सटाले,श्री संत शिरोमणी नामदेव महाराज महिला मंडळ अकलूजच्याअध्यक्षा सौ. धनश्री पांडुरंग मुळे,उपाध्यक्षा सौ. रेखा नारायण जबडे आणि समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.


















