माळशिरस तालुक्यातील मौजे जांबूड को.प. बंधारा ते नीरा उजवा कालवा मेल क्र.77मधील उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळण्याबाबत आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील मौजे जांबूड को.प. बंधारा ते नीरा उजवा कालवा मेल क्र.77मधील उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळण्याबाबत आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण होऊन सुमारे ५० वर्षे पूर्ण झाली असून हे धरण जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले आहे. परंतु माळशिरस तालुक्यातील उंच भागास अद्यापही पाण्याचा थेंब मिळालेला नाही. तालुक्यातील निरा उजवा कालव्याच्या वरील बाजूस असलेली गावे पिढ्यानपिढ्या दुष्काळ सोसत आहेत.माळशिरस तालुका व सांगोला तालुक्यासाठी सांगोला- माळशिरस उपसा सिंचन योजना मंजूर करणेबाबत सन १९९४ साली मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मागणी केली. परंतु भिमा प्रकल्पाच्या द्वितीय सुधारीत मान्यता (२००४) मध्ये त्याचा अंर्तभाव झाला नाही. त्यानंतर सांगोला उपसा सिंचन योजना २ टी.एम.सी. योजनेस मंजूरी देण्यात आली. भिमा नदीवरील जांगूह को.प.बंधारा येथून पाणी उचलून माळशिरस तालुक्यासाठी २ टी.एम.सी. पाणी निरा उजवा कालवा मैल क्रं. ७७ मध्ये टाकून कमी पडणा-या पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी उपसा सिंचन योजनेचा अभ्यास करून सन २००६ साली त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.जांबूड येथील को.प.बंधारा येथून पाणी उचलून मैल क्रं. ७७ मध्ये टाकल्यास माळशिरस तालुक्यातील वंचित भागास व सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेल्या उपसा सिंचन योजनेस शाश्वत पाणी मिळू शकते. उजनी धरणाच्या नव्याने पाणी उपलब्धतेचा अभ्यास झाला असून त्यामध्ये पाणी उपलब्ध आहे. या उपलब्ध पाण्यातून सोलापूर जिल्ह्यातील एकमेव माळशिरस तालुक्यासाठी उपसा सिंचन योजना नसून माळशिरस मधील वंचित राहणा-या भागासाठी २ टी. एम.सी. उपसा सिंचन योजना मंजूर करणेत यावी.भिमा नदीवरील जांबूड को.प. बंधा-यातून पाणी उचलून निरा उजवा कालवा मैल क्रं. ७७ मध्ये किंवा तेथील परिसरातील उंच भागात टाकलेस सांगोला तालुका व माळशिरस तालुक्यातील सलग पाण्यापासून वंचित राहणा-या भागात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुमारे २० ते २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल. सांगोला उपसा सिंचन योजना स्वतंत्र करण्याऐवजी माळशिरस- सांगोला अशी उपसा सिंचन योजना एकत्र केल्यास खर्चात बचत होईल व भविष्यकाळात देखभाल दुरुस्ती व इतर खर्चातही बचत होणार आहे. यासाठी माळशिरस- सांगोला उपसा सिंचन योजना करणेबाबत बैठक आयोजित करणेत यावी अशी विनंती आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.







