वंचितच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत अकलूज नगरपरिषदेकडुन विविध कामास सुरुवात
वंचित बहुजन आघाडी अकलूज शहरच्या वतीने आंबेडकरनगर, महर्षी कॉलनी, इंदिरा नगर येथील स्वच्छताविषयक कामांचे निवेदन अकलूज नगरपरिषदेस देण्यात आले होते. त्यावेळी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी तात्काळ दखल घेत काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज इंदिरा नगर येथील गटारीच्या स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात आले असुन आंबेडकर नगर याठिकाणी मुख्य प्रवेशद्वारापासुन मुरुमीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आलेला आहे. त्याचवेळी आंबेडकरनगर, महर्षी कॉलनी, इंदिरा नगर येथील महिला व पुरुषांची स्वच्छतागृहे नवीन बांधुन देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी अकलूज शहरच्या वतीने करण्यात आली होती त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असुन बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ले आऊट च्या कामास सुरुवात केली आहे त्यामुळे हा प्रश्नही लवकर मार्गी लागणार आहे. यामुळे येथील कित्येक वर्षाचा प्रश्न मार्गी लागत असल्याने येथील स्थानिक रहिवाश्यांकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.







