*शिक्षण प्रसारक मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.*
संग्रामनगर दि.१८ (प्रतिनीधी) अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षामध्ये यश मिळवलेल्या १३१ गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शंकरनगरच्या स्मृती भवन शंकरनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक सुभाष दळवी,बाळासाहेब सणस,सौ. निशा गिरमे,रामभाऊ गायकवाड, उत्कर्ष शेटे,वसंतराव जाधव,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांच्यासह विविध शाखेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता १० मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ७२ विद्यार्थ्यांचा तर शाखावर प्रथम आलेल्या १७ विद्यार्थ्यांचा अशा १० वीच्या एकूण ८९ विद्यार्थ्यांचा आणि १२ वी तील ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या ३६ विद्यार्थ्यांचा व विषयात शंभर गुण प्राप्त केलेल्या ६ विद्यार्थ्यांचा अशा एकूण ४२ म्हणजेच इयत्ता १० आणि १२ एकत्र मिळून १३१ गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संपन्न झाला. इयत्ता दहावीचा संस्थेचा निकाल ९६.६१ टक्के लागला.तर संस्थेच्या पंधरा शाखांचा निकाल शंभर टक्के लागला.इयत्ता बारावीचा संस्थेचा निकाल ८८.३३ टक्के लागला आहे. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील म्हणाले,कोरोनाच्या कालावधीतही शाळाबंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून १३१ गुणवंत विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले हे कौतुकास्पद आहे.आपल्या पाल्याला हिऱ्यासारखे पैलू पाडणारे पालकांचे हे यश आहे. संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या,शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण करते.संस्थेत एकूण २८ हजार ६७७ विद्यार्थी शिक्षण घेतात. संस्थेच्या शहरातील शाखेबरोबरच टेक्नॉलॉजीच्या आधारे ग्रामीण भागातील विद्यार्थीही गुणवत्ता मिळवत आहेत.कोरोना कालावधीत संस्थेने ऑनलाइन शिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असताना विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पालकांची संभ्रमावस्था आहे.पूर्वी इंजिनिअरिंग कडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा होता.आता मात्र वैद्यकीय क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल दिसतो.शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.कोरोना काळात गुणवत्ता असणाऱ्या मुलींना पालकांनी पुढे उच्च शिक्षण दिले पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रस्ताविकात सचिव अभिजीत रणवरे यांनी शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला इयत्ता दहावीत संस्थेत प्रथम क्रमांक नमोकार सावळे ९७.४० टक्के,द्वितीय कु.दीक्षा निंबाळकर ९६.८०टक्के,व तृतीय कु.अनुजा ढोपे ९६.२०टक्के,तर इयत्ता बारावीत संस्थेत प्रथम कु.रिया गांधी ९३.६७ टक्के,द्वितीय प्राची लावंड ९३.३३टक्के,तर तृतीय कु.राजलक्ष्मी माने ९२.८३ टक्के प्राप्त केलेल्या या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने रोख रकमेच्या बक्षीसासह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कु.सृष्टी महाडिक व कु.दिव्यांनी मेहता या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कुमारी दीक्षा निंबाळकर हिने मिळालेले बक्षिसाची रक्कम २१०० रुपये कोरोनामध्ये पालक गमावलेल्या विद्यार्थिनींच्या गणवेशासाठी दिले.सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी,आर.आर.पाटील यांनी केले तर आभार संचालक वसंतराव जाधव यांनी मानले.










